122 YouTube-Based News Channels Blocked: डिसेंबर 2021 पासून 122 यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक; अनुराग ठाकूर यांची माहिती
अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, चॅनेलने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A चे उल्लंघन करणारा मजकूर प्रसारित केला आहे.
122 YouTube-Based News Channels Blocked: देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेशी संबंधित सामग्री प्रसारित केल्याने 2021 पासून 122 यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक (122 YouTube-Based News Channels Blocked) करण्यात आल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, चॅनेलने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A चे उल्लंघन करणारा मजकूर प्रसारित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिसेंबर, 2021 पासून, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या, संरक्षणाच्या हितासाठी, आयटी कायदा, 2000 च्या कलम 69A चे उल्लंघन करणारी सामग्री प्रसारित करण्यासाठी 122 YouTube आधारित वृत्त चॅनेलच्या सार्वजनिक प्रवेशास अवरोधित करण्याचे निर्देश जारी केले आहेत, असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Fake News YouTube Channels Blocked: मोदी सरकारचा फेक न्यूजवर 'Digital Strike'; 8 यूट्यूब चॅनल ब्लॉक)
STORY | 122 YouTube-based news channels blocked since Dec 2021: Anurag Thakur
READ: https://t.co/jWXY6aGu8V
(PTI File Photo) pic.twitter.com/D8s7rzOaMO
— Press Trust of India (@PTI_News) December 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2023 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

