Fake News YouTube Channels Blocked: मोदी सरकारचा फेक न्यूजवर 'Digital Strike'; 8 यूट्यूब चॅनल ब्लॉक
YouTube (Photo Credits: Getty Image)

Fake News YouTube Channels Blocked: सोशल मीडियाच्या युगात फेक न्यूज हे सरकारसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून त्यावर कारवाई सुरूच आहे. ताज्या माहितीनुसार, सरकारने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचारासाठी 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. केंद्र सरकारने शेअर केलेल्या माहितीनुसार, IT नियम, 2021 अंतर्गत 7 भारतीय आणि एक पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे. हे यूट्यूब चॅनेल 114 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. याशिवाय त्यांचे 85 लाख 73 हजार सब्सक्राइबर होते.

केंद्रीय मंत्रालयाने ब्लॉक केलेले सर्व YouTube चॅनेल त्यांच्या व्हिडिओंवर जातीय सलोखा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि भारताच्या परराष्ट्र संबंधांना हानिकारक असलेल्या खोट्या सामग्रीसह जाहिराती प्रदर्शित करत होते. यापैकी काही YouTube चॅनेलद्वारे प्रकाशित केलेल्या मजकूराचा उद्देश भारतातील धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवणे हा होता. ब्लॉक केलेल्या YouTube चॅनेलच्या विविध व्हिडिओंमध्ये खोटे दावे करण्यात आले होते. यात बनावट बातम्यांचा समावेश करण्यात आला होता. उदा. भारत सरकारने धार्मिक वास्तू पाडण्याचे आदेश दिले आहेत, भारत सरकारने धार्मिक सण साजरे करण्यावर बंदी घातली आहे, इ. अशा मजकूरात जातीय तेढ निर्माण करण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता असल्याचे आढळून आले. (हेही वाचा - Subhash Chandra Bose यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत Shiv Sena MP Priyanka Chaturvedi यांचं PM Narendra Modi यांना पत्र; नेताजींच्या अस्थी भारतात परत आणण्याची मागणी)

दरम्यान, YouTube चॅनेलचा वापर भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवर खोट्या बातम्या पोस्ट करण्यासाठी देखील केला गेला. राष्ट्रीय सुरक्षा आणि परकीय राज्यांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध याच्या दृष्टीकोनातून सामग्री पूर्णपणे खोटी आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले. यापूर्वी एप्रिल महिन्यात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत भारतातील 22 यूट्यूब चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घातली होती. या वाहिन्या तत्काळ प्रभावाने ब्लॉक करण्यात आल्या.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, ही कारवाई करण्यात आली होती. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार करण्यासाठी या चॅनेलला ब्लॉक करण्यात आले होते. त्यापैकी 18 भारतीय यूट्यूब न्यूजशिवाय 4 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलही ब्लॉक करण्यात आले होते.