Facebook, Instagram Down: सोशल मीडिया फेसबुक व इंस्टाग्राम डाऊन; ट्वीटरवर तक्रार करत वापरकर्त्यांनी पोस्ट केले भन्नाट मीम्स (See Tweets)
सोशल मिडिया (Photo Credits: PTI)

जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया फेसबुक आणि इंस्टाग्राम याक्षणी डाऊन झाले असल्याची माहिती मिळत आहे. या वेबसाइट लोड करण्याचा प्रयत्न करीत असताना, एरर संदेश दिसत असल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांनी केल्या आहेत. सध्या कंपनी ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ही दोन्ही प्रमुख सोशल मीडिया सध्या डाऊन असल्याने ट्वीटर सरकाह्य सोशल मीडियावर मीम्सचा पूर लागला आहे, अनेक युजर्सनी अनेक विनोदी मीम्स पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. युजर्स यानंतर सध्या ट्वीटरवर तक्रार करत असल्याने #FacebookDown आणि #InstagramDown ट्रेंड होत आहेत.

इन्स्टाग्रामच्या जवळजवळ 5000 हून अधिक वापरकर्त्यांनी ही समस्या नोंदवली आहे, तर साधारण 224 वापरकर्त्यांनी फेसबुकवर फीड लोड होत नसल्याचे सांगितले आहे.

पहा असेच काही भन्नाट मीम्स -

(हेही वाचा: फेसबूक EssilorLuxottica च्या मदतीने 2021 मध्ये लॉन्च करणार स्मार्ट ग्लासेस!)

डाउन डिटेक्टरने याची पुष्टी केली आहे की, दोन्ही सोशल मीडिया साइट्समध्ये काही समस्या उद्भवण्या आहेत आणि वापरकर्ते त्यांची खाती आणि डेटामध्ये प्रवेश करण्यात अक्षम आहेत. काही युजर्सनी सांगितले आहे की, मोबाईलवर ही दोन्ही सोशल मीडिया काही प्रमाणात चालू आहेत मात्र, डेस्कटॉपवर यांना समस्या निर्माण होत आहे. या समस्येचा भारत, अमेरिका आणि जगातील इतर काही भागात परिणाम झाला आहे.