इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कमाल! Apple Watch ने वाचवला जीव, तर रुग्णाच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी डॉक्टर वापरत आहेत IPhone 13 Pro Max चा कॅमेरा
प्रातिनिधिक प्रतिमा (Image: PTI)

अनेक वेळा आपण एक शौक म्हणून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकत घेतो, मात्र त्याच्या संपूर्ण फीचर्सवर लक्ष देत ​​नाही. अनेकदा ही उपकरणे खूप फायद्याची ठरू शकतात. नुकतेच Apple कंपनीचा मोठा इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमात कंपनीने अनेक नवीन फोन्स व घड्याळे सादर केली. Apple ची उत्पादने ही खूप महागडी असतात अशी नेहमीच तक्रार केली जाते. मात्र आता Apple ची दोन उपकरणे सामान्य जीवनात किती उपयोगाची ठरली आहेत हे समोर आले आहे. सिंगापूरमधील 24 वर्षीय विद्यार्थ्याचा दुचाकी चालवताना अपघात झाला तेव्हा Apple च्या एका उपकरणामुळे या मुलाचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद फित्री हा 24 वर्षीय तरुण सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. तो आपल्या मोटारसायकलवरून जात असताना एका व्हॅनला धडकला आणि खाली पडला. अपघात झाल्याचे पाहताच व्हॅन तिथून निघून गेली. मोहम्मद बराच वेळ रस्त्यावर तसाच पडून होता. परंतु त्याने हातात बांधलेले Apple वॉच त्याच्या हालचालीचा मागोवा घेत होता. बराच काळ मोहम्मदच्या शरीराची हालचाल झाली नाही, हे पाहता स्मार्टवॉचने त्याच्या स्वयंचलित प्रोग्रामिंगद्वारे प्रथम आपत्कालीन सेवेला कॉल केला आणि नंतर मोहम्मद फित्रीच्या काही ओळखीच्या लोकांना संपर्क केला.

घड्याळाने वेळेवर अपघाताची माहिती दिली नसती तर कदाचित मोहम्मदची प्रकृती आणखी बिघडली असती. Apple ने अखेर बहुचर्चित आणि लोकप्रिय सिरीज आयफोन 13 लाँच केली आहे. या 13 सीरीज अंतर्गत कंपनीने चार स्मार्टफोन सादर केले आहेत. यामध्ये, टॉप एंड व्हेरिएंट आयफोन 13 प्रो मॅक्स आहे, त्यानंतर आयफोन 13 प्रो, आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनी स्मार्टफोन आहेत. आता अमेरिकेतून बातमी समोर आली आहे की, एक डॉक्टर आजकाल डोळ्यांच्या उपचारासाठी आयफोन 13 प्रो मॅक्स वापरत आहे. (हेही वाचा: ॲपलचा मेगा इव्हेंट; iPad, iPad Mini, Apple Watch Series 7 सह बहुप्रतीक्षित iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max लाँच)

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील शार्प हेल्थ केअरमधील नेत्र रोग विशेषज्ञ टॉमी कॉर्न (Tommy Korn) आयफोन 13 प्रो मॅक्स वापरून रुग्णांच्या डोळ्यांचे मॅक्रो शॉट्स क्लिक करत आहेत. डॉक्टरांनी आपल्या लिंक्डइन प्रोफाइलव Apple फोनद्वारे क्लिक केलेले डोळ्याचे मॅक्रो शॉट्स शेअर केले आहेत. या फोनमध्ये रुग्णाच्या डोळ्यामध्ये झालेल्या सुधारणा स्पष्ट दिसत आहेत.