Apple Event 2021: ॲपलचा मेगा इव्हेंट; iPad, iPad Mini, Apple Watch Series 7 सह बहुप्रतीक्षित iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max लाँच
Apple Event 2021 (संग्रहित संपादित प्रतिमा)

टेक जायंट Apple दरवर्षी आपला मेगा लॉन्च इव्हेंट आयोजित करते, जिथे नवीन फोन्स व इतर गॅझेट्स सादर केली जातात. यंदाचा हा इव्हेंट कंपनीने आज 14 सप्टेंबर रोजी आयोजित केला होता. जगभरातील तमाम टेक सॅव्ही लोकांना या कार्यक्रमाची उत्सुकता होती. हा एक व्हर्च्युअल 'कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग' इव्हेंट होता, ज्यामध्ये कंपनीने आयफोन सिरीजसह अनेक उत्तम गॅझेट्स सादर केली. या कार्यक्रमाची सुरुवात अॅपलने आपल्या नवीन आयपॅडच्या (iPad) अनावरणासह केली.

कंपनीने आज त्यांचा नवीन आयपॅड सादर केला. नवीन iPad मध्ये A13 Bionic चिपसेट आहे. यात 12MP अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा आणि सेंटर स्टेज फीचर आहे. नवीन आयपॅडमध्ये स्मार्ट कीबोर्ड असून, तो 1st जनरल Apple पेन्सिललाही सपोर्ट करतो. याची किंमत $ 299 आहे.

Apple ने यावेळी आपला नवीन iPad Mini लाँच केला. यामध्ये 8.3-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले, टच आयडी, यूएसबी-सी पोर्ट, 5 जी सपोर्ट मिळतो. यात फोकस पिक्सेलसह 12 एमपीचा रियर कॅमेरा आणि फ्रंटवर 12 एमपी अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स देखील आहे. आयपॅड मिनी 2nd जनरेशन Apple पेन्सिलला सपोर्ट करतो. याची किंमत $ 499 आहे आणि पुढील आठवड्यात तो उपलब्ध होईल.

आजच्या कार्यक्रमामध्ये कंपनीची आपले नवीन फ्लॅगशिप स्मार्टवॉच Apple Watch  सीरीज 7 ची घोषणा केली. Apple Watch Series 7 वॉचओएस 8 च्या अपडेटसह सुरू होते. Apple Watch Series 7 मध्ये नवीन डिझाईन आहे, ज्याचा नवीन रेटिना डिस्प्ले वॉच सीरीज 6 पेक्षा 20 टक्के मोठा आहे. Apple Watch Series 7 ची किंमत $ 399 पासून सुरू होते.

कंपनीने आजच्या इव्हेंटमध्ये नवीन iPhone 13 सिरीज सादर केली, ज्याची सर्वांना उत्सुकता होती. यामध्ये Apple iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max चा समावेश आहे. Apple iPhone 13 Mini आणि iPhone 13 मध्ये A15 Bionic प्रोसेसर आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये सेन्सर शिफ्ट ओआयएस सह 12 MP वाइड-अँगल आणि 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मध्ये सिनेमॅटिक मोड, 5 जी सपोर्ट आणि कस्टमाईड डिझाइन केलेले अँटेना देखील मिळतात. आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीमध्ये 6.1 इंच आणि 5.4 इंच आकाराचे डिस्प्ले आहेत.

आयफोन 13 प्रो ग्रेफाइट, गोल्ड, सिल्व्हर आणि 'सिएरा ब्लू' कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये A15 बायोनिक चिपसेट बसवण्यात आले आहे, जो 50 टक्के वेगवान ग्राफिक्स देतो. आयफोनमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. डिस्प्ले 10 Hz ते 120 Hz पर्यंत व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह येतो. (हेही वाचा: Jio चा स्वस्तातील 4G फोनसह JioBook लॅपटॉप सुद्धा होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)

आयफोन 13 हा 128 जीबी व्हेरिएंटपासून सुरू होणाऱ्या तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, ज्याची किंमत 799 डॉलर आहे. कंपनी हा 256 GB आणि 512 GB व्हेरिएंटमध्ये विकणार आहे. आयफोन 13 मिनी 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 699 डॉलर्सपासून सुरु आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन आयफोन 13 मध्ये आयफोन 12 च्या तुलनेत 2.5 तास अतिरिक्त बॅटरी मिळत आहे. आयफोन 13 प्रो हा 999 डॉलर्सपासून सुरू होईल, तर आयफोन 13 प्रो मॅक्स 1099 डॉलर्स पासून सुरू होईल. दोन्ही फोन शुक्रवारी ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध असतील व 24 सप्टेंबर रोजी त्याचे शिपिंग होईल.