Reliance Jio (Photo Credit: Facebook)

टेलिकॉम कंपनी Reliance Jio आपला भारतात आपला सर्वाधिक स्वस्त 4G स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार आहे. अशातच आता कंपनी लॅपटॉप सुद्धा लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. JioBook लॅपटॉप लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. कथित रुपात हा लॅपटॉप ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (bis) बेवसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. ही एक सर्टिफिकेशन बेवसाइट आहे. येथे लॅपटॉपचे काही फिचर्स बद्दल ही सांगण्यात आले आहे. अपकमिंग लॅपटॉप तीन वेरियंटमध्ये येणार आहे. इंटरनल मॉडेल व्यतिरिक्त याच्या अन्य फिचर बद्दल अधिक माहिती समोर आली आहे.

जुन्या रिपोर्ट्सनुसार, JioBook 4G LTE कनेक्टिव्हिटीपेक्षा लैस असणार आहे. याच्या फिचर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त 4जीबी LPDDR4x रॅम आणि 64GB स्टोरेज दिला जाऊ शकतो. मात्र लॅपटॉप कधी लॉन्च केला जाणार याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.(Reliance Jio Plans: रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना झटका, कंपनीचे सगळ्यात स्वस्त असलेले 'हे' दोन प्लॅन बंद)

लॅपटॉपच्या कनेक्टिव्हिटी  बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये एक मिनी HDMI कनेक्टर दिला जाऊ शकतो. त्याचसोबत ड्यूल बँड वायफाय आणि ब्लूटूथ सारखे फिचर्स ही मिळू शकतात. असे बोलले जात आहे की, यामध्ये थ्री एक्सिस एक्सीलेटर आणि क्वॉलकॉम ऑडिओ चीप सुद्धा मिळू शकते. JioBook मध्ये कंपनी नेटिव अॅप्सJio Store, JioMeet आणि JioPages चा समावेश असण्याची शक्यता आहे.