Reliance Jio Plans: रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना झटका, कंपनीचे सगळ्यात स्वस्त असलेले 'हे' दोन प्लॅन बंद
Reliance Jio (Photo Credits: Twitter/ Reliance Jio)

देशातील आघाडीची नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाणारी रिलायन्स जिओने (Reliance Jio) त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने त्यांचे सर्वात स्वस्त असेलेले दोन बंद करीत आहे. रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना यापुढे 39 आणि 69 रुपयांचे प्लॅन वापरता येणार नाही. याचबरोबर हे दोन्ही प्लॅन जिओच्या अधिकृत वेबसाइट आणि मायजियो अॅपवरूनही काढून टाकण्यात आले आहेत. सध्या कंपनी त्यांचा आगामी 4G स्मार्टफोनसाठी नवीन प्लॅन लॉन्च करण्याची योजना आखत असल्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ आणि गुगलने केलेल्या ताज्या घोषणेनुसार 4G फोन दिवाळीपूर्वी बाजारात दाखल होणार आहे.

रिलायन्स जिओचे 39 आणि 69 रुपयांचा प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांना यापुढे 75 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. जिओच्या अधिकृत वेबसाइटवर सध्या 125, 155, 185 आणि 749 रुपयांचे प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहेत. हे देखील वाचा- Google Search साठी आले Dark मोड फिचर, युजर्सला 'या' पद्धतीने करता येईल अॅक्टिव्हेट

जिओच्या 39 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 100 एमबी डेटा तसेच भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची ऑफर देण्यात आली होती. या प्लानची 14 दिवसांची मर्यादी असून 100 एसएमएस देखील मिळत होते. तसेच JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्स या योजनेसह उपलब्ध होते.

तसेच, 69 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 500 एमबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि एकूण 100 एसएमएस मिळतात. हा पॅक 14 दिवसांच्या मर्यादासह उपलब्ध होता. तसेच JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्स या योजनेसह उपलब्ध होते.