Disappearing Messages Meaning In Marathi: व्हॉट्सअ‍ॅप वर 'डिसअपरिंग मेसेजेस' चं फीचर म्हणजे काय? कसे वापराल? घ्या जाणून
WhatsApp Pixabay

WhatsApp आपल्या युजर्सना आकर्षिक करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच विशेष प्रयत्न करतो. त्यासाठी वेळोवेळी अ‍ॅप मध्ये विविध अपडेट्स आणले जातात. आता मेसेज डिसअपिरिंगचा (Disappearing Messages) नवा पर्याय युजर्सना देण्यात आला आहे. या फीचर मुळे मेसेज विशिष्ट काळानंतर जाण्यास आपण परवानगी देऊ शकतो परिणामी फोनची इंटरनल मेमरी देखील वाचवण्यासाठी मदत होऊ शकते. हे फिचर वापरण्यासाठी युजरला आपल्या व्हॉट्सॲप सेटींग्जमध्ये जाऊन Enable किंवा Disable पर्याय निवडावा लागतो. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे काही वेळाने तुमच्या चॅटवरील मेसेज आपोआप डीलिट होतो. त्यामुळे आपल्या फोनची मेमरी जास्त वापरली जात नाही आणि आपला फोनही Slow होत नाही.

Whatsapp ने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आपण Disappearing Messages फीचर इनेबल (Enable) करता तेव्हा आपल्याला कालावधीही निश्चित करावा लागतो. हा कालावधी 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवसांचा असतो. यापैकी एक कालावधी निश्चित केल्यानतर संबंधित संदेश आपल्या फोनमधून आपोआप डीलिट होऊन जातील. दरम्यान, ही सूचना केवळ त्याच संदेशांना लागू राहील जे हे फीचर कार्यरत केल्या नंतरच्या मेसेजला लागू राहील.

Android किंवा iPhone मध्ये Disappearing Messages कसे सुरू कराल?

सर्वात प्रथम तुमचे व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chat) ओपन करा. त्यानंतर एक नाव निवडा.जे तुम्हाला हवे आहे. त्यानंतर Disappearing Messages वर टॅप करा. आता तुम्हाला 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवस यांपैकी एक कालावधी निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर हे फिचर तुमच्या व्हॉट्सॲप वर कार्यरत होईल.

Android किंवा iPhone मध्ये Disappearing Messages कसे बंद कराल?

Disappearing Messages ऑन केल्यानंतर त्याचॅटचे मेसेज स्वत:हून डिलीट न होण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chat) ओपन करा. त्यानंतर नावावर टॅप करा. आता Disappearing Messages वर टॅप करा आणि ते बंद करा.

व्हॉट्सॲप युजर एखाद्या मित्रासोबत केलेल्या  चॅटसाठीही  हा पर्याय ऑन किंवा ऑफ करु शकतात एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठीही हा पर्याय वापरता येऊ शकतो. याशिवाय ग्रुप अॅडमीनही Disappearing Messages हे फिचर वापरु शकतात. ग्रुपवर हे Disappearing Messages फिचर ऑन केल्यास एखाद्या ग्रुप सदस्याने हा मेसेच विशिष्ट दिवसात वाचला नाही तर तो त्याच्या नकळत निश्चित कालावधीत डीलिटही होऊ शकतो.