Boat Watch Mercury (Photo Credits-Twitter)

बोटचे (BOAT) शानदार स्मार्टवॉच बोट वॉच मर्क्युरी (Boat Watch Mercury)  भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे युजर्सला याद्वारे शरीराचे तापमान तपासू शकतात. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजन मॉनिटरिंग उपलब्ध असेल. इतकेच नाही तर स्मार्टवॉचमध्ये फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी लक्षात घेऊन स्पोर्ट्स मोडही देण्यात आले आहेत. (OPPO Reno 7 Pro League of Legends Edition लॉन्च, 12GB RAM, 50MP कॅमेऱ्यासह जाणून घ्या जबरदस्त फिचर्स आणि किंमतसुद्धा)

बोट वॉच मर्क्युरीमध्ये 1.54 इंच स्क्वेअर डायल आहे. यामध्ये हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीचा मागोवा घेण्यासोबतच रिअल-टाइम तापमान मॉनिटरिंगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, युजर्सला वॉचमध्ये 10 स्पोर्ट्स मोड्स मिळतील. ज्यामध्ये चालणे, सायकलिंग, धावणे आणि योग यासारख्या ऑप्शनचा समावेश आहे. युजर्सला त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह फिटनेस प्रोग्राम ही शेअर करता येणार आहे.

बोटने आपल्या नव्या स्मार्टवॉचमध्ये मासिक पाळी ट्रॅकर दिला आहे, जो महिलांसाठी खूप उपयुक्त ठरेल. याशिवाय 100 पेक्षा जास्त वॉच फेस, संगीत, कॅमेरा कंट्रोल आणि मेसेज-कॉल नोटिफिकेशन्स यांसारखे फिचर्स मिळणार आहेत. स्मार्टवॉचची खरी किंमत किंमत 6,990 रुपये आहे. परंतु इंट्रोक्टडरी ऑफर अंतर्गत ते 1,999 रुपयांच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते. हे स्मार्टवॉच ब्लॅक, ग्रीन, ब्लू आणि क्रीम कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या घड्याळाची विक्री 15 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.(Infinix ने भारतात लाॅन्च केले दोन दमदार स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक)

दरम्यान, कंपनीने  या वर्षी जुलैमध्ये बोट वॉच एक्स्टेंड लॉन्च केले. त्याची किंमत बजेट श्रेणीत आहे. या घड्याळात LCD 2.5D कर्व्ड डिस्प्ले आणि 50 पेक्षा जास्त क्लाउड आधारित घड्याळासाठी फेस दिले आहेत. याशिवाय बोट वॉच एक्स्टेंडमध्ये हृदयाची गती ट्रॅकिंग, SpO2 मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंगसह 14 स्पोर्ट्स मोड उपलब्ध असतील. यामध्ये धावणे, सायकल चालवणे आणि चालणे यासारख्या ऑप्शनचा समावेश आहे.