OPPO Reno 7 Pro League of Legends Edition लॉन्च, 12GB RAM, 50MP कॅमेऱ्यासह जाणून घ्या जबरदस्त फिचर्स आणि किंमतसुद्धा
OPPO Reno 7 Pro League of Legends | (Photo Credits: Twitter)

OPPO Reno 7 Pro ची लिमिटेड एडिशन League of Legends Edition लॉन्च झाली आहे. लॉन्चींगपूर्वीच बहुचर्चित राहिलेल्या OPPO आणि Riot Games यांनी भागिदारीकेली आहे. हा फोन रॉकेट-केनन आकाराच्या बॉक्ससोबत सादर करण्यात आला आहे. फोनसोबत कंपनीने फओनमध्ये अनेक प्री-लोडेड कंटेंट आणि थीमही उपलब्ध करुन दिल्या आहेत. स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस League of Legends च्या चॅम्पीयन कॅरेक्टर Jinx ने प्रभावीत असल्यासे दिसते. दरम्यान, फोनचे फीचर्स रेग्युलर OPPO Reno 7 Pro प्रमाणेच आहेत.

ओप्पोच्या या स्पेशल एडिशन स्मार्टफोनची किंमत एका शोरुममध्ये CNY 3,999 (जवळपास 47,500 रुपये) इतकी सांगितली जात आहे. फोन एकाच 12GB RAM + 256GB स्टोरेज ऑप्शनसोबत येतो. हा फोन चीनमध्ये 10 डिसेंबरपासून विक्रिसाठी उपलब्ध असेन. हा फोन जगभरातील इतर देशांमध्येही उपलब्ध करुन दिला जाणार का? याबाबत मात्र कंपनीने अधिकृतरित्या अद्याप तरी कोणतीही माहिती दिली नाही. जाणून घ्या फोनचे फिचर्स. (हेही वाचा, Flipkart Big Bachat Dhamaal Sale मध्ये iPhone 12 ते iPhone 12 Mini वर मिळत आहे ही धमाकेदार ऑफर)

OPPO Reno 7 Pro फीचर्स

डिस्प्ले आणि स्टोरेज

 • 6.55 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले (रेजोल्युशन 1080 x 2400 पिक्सल)
 • 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट
 • MediaTek Dimensity 1200 Max SOC
 • 12GB RAM
 • 256GB इंटरनल स्टोरेज

कॅमेरा

 • फोनच्या पाठीमागे रियर कॅमेरा सेटअप
 • प्रायमरी कॅमेरा-50MP
 • 2MP मायक्रो आणि एक 8MP वाईल्ड अँगल कॅमेरा सेन्सर
 • 32MP सेल्फी कॅमेरा (पंचहोल डिझाईनसोबत)
 • बॅटरी

  4,500mAh बॅटरी ( 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट)

स्मोर्टफोन विश्वातील अभ्यासक सांगतात की, OPPO Reno 7 सीरीज लवकरच भारतीय बाजारातही लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी तसे संकेत मात्र मिळत आहेत. इतकेच नव्हे तर कंपनी या महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या OPPO INNO Day इवेंट मध्ये आगामी काळातीलआपल्या अनेक टेक्नॉलॉजीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.