Flipkart कडून Big Bachat Dhamaal sale वर मोठी डिस्काऊंट जाहीर केली आहेत. आता 2022 हे नवं वर्ष आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे मग या सेलच्या माध्यमातून तुम्हांला नव्या वर्षात काही प्रिमियम स्मार्टफोन्स घेण्याची चांगली संधी आहे. यामध्ये iPhone 12, iPhone 12 mini, iPhone SE, Vivo X70 Pro वर धमाकेदार ऑफर्स आहेत.
आयफोन 12 वर डिस्काऊंट जाहीर करण्यात आली आहेत. 64 जीबीचा फोन 39,949 मध्ये उपलब्ध आहे त्याची मूळ किंमत 65,900 होती. त 64 जीबीचा फोन 55,999 आणि 128 जीबी 61,999 रूपयांना उपलब्ध आहे. यासोबतच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. त्यामध्ये 16,050 रूपयांपर्यंत ऑफर मध्ये फायदा मिळणार आहे. या एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास 64 जीबी व्हेरिएंट Rs 39,949 मध्ये उपलब्ध होईल. नक्की वाचा: iPhone 12 Pro च्या किंमतींमध्ये कपात, Amazon India वर मिळवा 25 हजार रूपयांची सूट .
तुम्हांला डिजिटल व्यवहारामध्ये 20% डिस्काऊंट हे Amex Network Card धारकांना पहिल्या ट्रान्झॅक्शन वर मिळणार आहे. तसेच ही ऑफर आयसीआयसीआय बॅंक, इंडसइंड बॅंक किंवा एसबीआय ग्राहकांनाही मिळणार आहे.
फ्लिपकार्ट कडून अॅपल आयफोन 12 मिनी या लहान आकाराच्या मॉडर्न आयफोन वर देखील सूट मिळणार आहे. 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 44,999 आहे. यावर तुम्ही एक्सचेंज ऑफरची देखील सूट मिळवू शकता. iPhone SE (2020) हा या सेलमध्ये फ्लिपकार्ट वर 27,999 मध्ये उपलब्ध होत आहे. 128 जीबी च्या मॉडेलची किंमत Rs 32,999 आणि 256 जीबी च्या मॉडेलची किंमत Rs 42,999 आहे.
अॅपल डिव्हाईसच्या खरेदीवर Disney+ Hotstar चं 499 रुपयांचं वर्षाचं सब्सक्रिप्शन देखील ग्राहकांना मोफत मिळणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 5% कॅशबॅक तर कॅनरा बॅंकेच्या कार्ड होल्डर्स ना 10% इंस्टंट डिस्काऊंट देणार आहे.आयफोन प्रमाणेच या
सेलमध्ये Vivo X70 Pro, Motorola G60,Realme GT Neo 2, Asus ROG Phone 3 यावर देखील सूट मिळत आहे.