iPhone 12 Pro च्या किंमतींमध्ये कपात, Amazon India वर मिळवा 25 हजार रूपयांची सूट
iphone (Photo Credits: File Photo)

येत्या काही दिवसांमध्ये नवं वर्ष सुरू होत आहे. 2022 ची लवकरच सुरूवात होणार आहे. या न्यू इयरच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून तुम्ही स्मार्टफोन वर ऑफर्सची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक गूड न्यूज आहे. आता तुम्हांला 2022 सुरू होण्याची वाट पहावी लागणार नाही. अमेझॉन इंडिया कडून iPhone 12 Pro models वर ग्रेट डिल्स जाहीर केली आहेत. तुम्ही अमेझॉन इंडिया वरून आयफोन घेत असाल तर iPhone 12 Pro of 128GB variant - Pacific Blue variant हा 94,900 रूपयांना उपलब्ध होत आहे. त्याची मूळ किंमत ₹1,19,900 आहे. अ‍ॅपा कडून आयफोन 12 प्रो वर 25 हजारांची सूट जाहीर केली आहे. वेगवेगळ्या व्हेरिएंट प्रमाणे डिस्काऊंट डिल्स देखील वेगवेगळे आहेत. केवळ हीच ऑफर नाही तर तुम्हांला एक्सचेंज ऑफर मध्येदेखील 15 हजार रूपये ऑफ मिळू शकतात.

अमेझॉन वर iPhone 12 Pro चा 256GB variant हा ₹99,990 मध्ये उपलब्ध आहे. यावर तुम्हांला मूळ किंमतीवर 30 हजारांची सूट मिळणार आहे. तर 512GB व्हेरिएंट वर 42 हजारांची सूट आहे. या व्हेरिएंटची मूळ किंमत 1,07,900 रूपये आहे. नक्की वाचा: World's Best-Selling 5G Device: तमाम कंपन्यांना मागे टाकून Apple चा iPhone 12 ठरला जगातील सर्वाधिक विकला जाणारा 5G डिव्हाइस .

तुम्ही जर AirPods घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी देखील ऑफर्स आहेत. Apple iPhone 12 Pro आणि AirPods Pro combo हे अमेझॉन वर ₹1,15,395 वर उपलब्ध आहे. या डिल मध्ये 28,910 रूपयांचा फायदा होत आहे. या कॉम्बो ची मूळ किंमत ₹1,44,800 आहे.

दरम्यान आयफोन 13 वर सध्या काही डिस्काऊंट नाही. Apple iPhone 13 series ही मिनी व्हेरिएंट पासून सुरू होते. त्याची किंमत ₹69,900 आहे. तर 256GB साठी ₹79,900 आणि 512GB साठी ₹99,900 मोजावे लागणार आहेत. Pro Max सीरीज मधील फोन हे 128GB साठी ₹1,29,900, 256GB साठी ₹1,39,900 आणि 512Gb साठी ₹1,59,900 मोजावे लागणार आहेत. सर्वात महागडा iPhone हा 1TB iPhone 13 Pro Max आहे त्याची किंमत₹1,79,900 आहे.