Apple ने अलीकडेच लॉन्च केलेल्या आयफोन 12 (iPhone 12) सिरीजच्या स्मार्टफोनचा भारतासह जगभरात जलवा दिसून येत आहे. सध्या जवळजवळ प्रत्येक देशाला मोठा आर्थिक फटका बसला असूनही आयफोन 12 साठी लोकांच्या उड्या पडल्या आहेत. म्हणूनच की काय हुवावे, वनप्लस, सॅमसंग, ओप्पो अशा अनेक नावाजलेल्या कंपन्यांच्या फोन्सना मागे टाकून, आयफोन 12 हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा 5 जी मोबाइल (World's Best-Selling 5G Device) बनला आहे. आयफोन 12 लॉन्च झाल्याच्या 12 आठवड्यांच्या आत तो जगातील सर्वाधिक विक्री होणारा 5 जी फोन बनला आहे.
आयफोन 12 या 5 जी स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री ऑक्टोबरमध्ये झाली होती. आयफोन 12 प्रो हा 5 जी कनेक्टिव्हिटी असलेला दुसरा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन ठरला आहे. विशेष म्हणजे आयफोन 12 सिरीजचे स्मार्टफोन बर्यापैकी महाग आहेत, परंतु तरीही लोकांनी या मोबाइलला पसंती दिली आहे. या स्मार्टफोनची मागणी आणि विक्रीही वाढली आहे.
आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो नंतर, 5 जी कनेक्टिव्हिटीसह सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा (Samsung Galaxy Note 20 Ultra) आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर हुआवेई नोवा 7 5 जी (Huawei Nova 7 5G), पाचव्या क्रमांकावर हुआवेई पी 40 5 जी (Huawei P40 5G), सहाव्या क्रमांकावर ओप्पो ए 72 5 जी (Oppo A72 5G), सातव्या क्रमांकावर हुवावे पी 40 प्रो 5 जी (Huawei P40 Pro 5G), आठव्या क्रमांकावर सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 5 जी (Samsung Galaxy Note 20 5G), नवव्या क्रमांकावर सॅमसंग गॅलॅक्सू एस 20 प्लस 5 जी (Samsung Galaxu S20 Plus 5G) आहे तर दहाव्या क्रमांकावर ओप्पो रेनो 4 एसई (Oppo Reno 4 SE) आहे.
5 जी कनेक्टिव्हिटीसह सर्वाधिक विक्री करणारा स्मार्टफोन आयफोन 12 चा एकूण बाजारातील वाटा 16% आहे. त्याच वेळी, आयफोन 12 प्रोचा वाटा 8% आहे. यानंतर, सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा 5 जीचा बाजारातील हिस्सा 4% आहे.
Apple ने 23 ऑक्टोबर रोजी आयफोन 12 सिरीजचे स्मार्टफोन जगभरात लाँच केले. 6.1 इंचाच्या आयफोन 12 मध्ये Super Retina XDR OLED HDR10 डिस्प्ले आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये सादर झालेल्या या मोबाइलमध्ये 2815 एमएएच बॅटरी आहे. या फोन्सची किंमत 80 हजार ते 1 लाखांपर्यंत आहे.