आर्थिक वर्ष 2020 च्या तिसर्या तिमाहीत भारती एअरटेलला (Bharti Airtel) मोठा धक्का बसला आहे. या तिमाहीत भारती एअरटेलचे एकूण 1,035 कोटी रुपयांचे नुकसान (Quarter Loss) झाले आहे. यापूर्वी कंपनीने वित्तीय वर्ष 2019 च्या दुसऱ्या तिमाहीत 23,045 कोटी रुपयांची तोटा दाखविला होता. आकडेवारीनुसार, या तिमाहीत 14 वर्षांत भारती एअरटेलचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत भारती एअरटेलचा 86 कोटींचा नफा झाला होता. ऑक्टोबरच्या तुलनेत भारती एअरटेलचा एकूण नफा 8.5 टक्क्यांनी वाढून 21,947 कोटी झाला.
मागील वर्षी याच काळात कंपनीचा महसूल 20,231 कोटी रुपये होता. जूनच्या तिमाहीतही एअरटेलला 2,485 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ज्यासाठी आता कंपनीने दूरसंचार सेवांच्या किंमती वाढविण्यास पाठिंबा दर्शविला आहे. भारती एअरटेलने डिसेंबर 2019 मध्ये दर वाढवण्याची घोषणा केली होती. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे एक पाऊल असल्याचे मानले जात होते. एजीआर म्हणून कंपनीचे, 35,586 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सर्व टेलिकॉमला कंपन्यांना दूरसंचार विभागाने 1 लाख कोटींच्या उत्तरदायित्वाची नोटीस दिली आहे, त्यात व्याज आणि दंड देखील समाविष्ट आहे. (हेही वाचा: व्होडाफोन-आयडिया, एअरटेल कंपनीने दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या)
डिसेंबरच्या तिमाहीत एअरटेलचे नुकसान झाले असले तरी, प्रत्येक वापरकर्त्याच्या सरासरी महसुलाच्या बाबतीत एअरटेलने 5.3 टक्के वाढ केली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या प्रत्येक वापरकर्त्याचा सरासरी महसूल 135 रुपये होता, तर जिओचा 128 रुपये होता. या व्यतिरिक्त कंपनीचा डेटा वापरही जिओच्या तुलनेत जास्त झाला आहे. अशाप्रकारे स्पर्धेत कंपनी आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी होताना दिसत आहे.