Battlegrounds Mobile India गेमची अधिकृत घोषणा; जाणून घ्या Battle Royale Game ची वैशिष्ट्यं
Battlegrounds Mobile India (Photo Credits: Battlegrounds Mobile India)

साऊथ कोरियन गेम मेकर Krafton यांनी अधिकृतरित्या Battlegrounds Mobile India game ची घोषणा केली आहे. हा गेम पबजी मोबाईल इंडिया गेमचा रिब्रँडेड व्हर्जन आहे. पबजी मोबाईल ला भारतात बंदी घातल्यानंतर पबजी मोबाईल इंडिया भारतात लॉन्च करण्यात येणार होता. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया लॉन्च होत असताना कंपनी पबमोबाईल.इन डोमेन बंद करत आहे, असे एका रिपोर्टमधून समोर आले होते. कंपनीने अधिकृतपणे पबजी मोबाइल इंडियाचे नाव युट्युब चॅनलवर Battlegrounds Mobile India असे बदलले आहे.

याशिवाय गेम वेबसाईटवर आता GIF असलेला नवा लोगो पाहायला मिळत आहे. अधिकृत वेबसाईटनुसार, हा गेम मोबाईलवर जागतिक दर्जाचा एएए मल्टीप्लेअर गेमिंग अनुभव देईल, असे सांगण्यात येत आहे. कंपनीने अद्याप गेमच्या लॉन्चिंग डेटची घोषणा केली नाही. Krafton नुसार, battle royale game गेम इव्हेंट्स लॉन्च करणार असून त्याचे स्वतःचे एस्पोर्ट्स इकोसिस्टम टूर्नामेंट्स आणि लीग्स असतील.

Krafton’s Battlegrounds Mobile India New Logo (Photo Credits: Official Website of Battlegrounds Mobile India)

भारतात गेम लॉन्च आणि खेळण्यास उपलब्ध होण्यापूर्वी त्याचे प्री-रजिस्ट्रेशन सुरु होईल, असे Krafton ने सांगितले. Battlegrounds Mobile India चे मेकर्सनी esports ecosystem उभारण्यासाठी पार्टनर्स सोबत टायअप केलं आहे. गोपनीयतेच्या अधिकारांचा आदर केला जाईल याची खात्री देत ही कंपनी प्रत्येक टप्प्यावर डेटा संरक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करेल. कंटेंट क्रिएटर 'मॅक्सस्टर्न' नुसार, रॉयल गेम हा या महिन्याच्या अखेरीस किंवा बहुतेक जून 2021 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.