Amazon | (File Photo)

अॅमेझॉनचा समर सेल सुरु झाला आहे. या सेल अंतर्गत एअर कंडिशनर (Air Conditioner), रफ्रीजिरेटर (Refrigerator), एअर कुलर (Air Coolers), पंखे (Fans) इत्यांदीवर 50 टक्के ऑफ दिला जात आहे. या सेलमध्ये  समर अप्लायन्सस खरेदी करु शकता.  या सेलमध्ये Whirlpool, Samsung, Daikin,  Haier, Blue Star, IFB, या ब्रँडचे समर अप्लायन्सस तुम्ही खरेदी करु शकता. या सर्व प्रॉडक्ट्सवर ग्राहकांना आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास 1500 रुपयांचा इन्स्टट डिस्काऊंट दिला जात आहे.

अॅमेझॉनच्या या सेलअंतर्गत स्पिल्ट आणि विंडो एसीवर 35 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. 1 टन कॅपेसिटी असलेल्या एसीची किंमत 16,999 रुपयांपासून सुरु होते. 1.5 टनचा एसी तुम्ही 25,490 रुपयांना खरेदी करु शकता. 2 टनच्या सर्व एसीवर तुम्हाला 30 टक्के सूट मिळेल. यामध्ये तुम्हाला सॅमसंग, व्होलटास, एलजी, आयफएफी, टीसीएल आणि पॅनासॉनिक या ब्रँडच्या एसीवर सूट मिळेल. स्मार्ट एसी आणि इन्व्हर्टर एसीवर सुद्धा तुम्हाला आकर्षक सूट पाहायला मिळेल.

एअर कुलर वर या ऑफर अंतर्गत तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. यामध्ये पर्सनल कुलर. टॉवर कुलर आणि डेझर्ट कुलरवर सूट पाहावयास मिळेल. सॅम्फनी, बजाज, क्रॉमटन, हॅवेल्स, हिंद वेअर आणि केनस्टार या ब्रँड्सच्या कुलर्सवर तुम्हाला डिस्काऊंट मिळेल. अगदी 5000 रुपयांपासून तुम्ही हे कुलर्स खरेदी करु शकता.

अॅमेझॉनवर बेस्ट सेलिंग फ्रीजवर तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. यामध्ये सिंगल डोअर, डबल डोअर आणि ट्रिपल डोअर फ्रीजवर तुम्हाला आकर्षक डिस्काऊंट मिळेल. साईड बाय साईड फ्रीजवर सुद्धा तुम्हाला 40 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो.  अगदी 6490 रुपयांपासून तुम्ही फ्रीज विकत घेऊ शकता. सॅमसंग, व्हलपूल, एलजी, कॅन्डी, हायर आणि गोदरेज सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सवर तुम्हाला आकर्षक डिस्काऊंट मिळेल.

या सेल अंतर्गत सिलींग आणि टेबल फॅन्सवर तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. यासोबत डेकोरेटिव्ह फॅन्स आणि स्मार्ट फॅन्सवर देखील तुम्हाला खास डिस्काऊंट मिळेल. बजाज, उषा, हॉवल्स आणि ओरिएंट या ब्रँड्सच्या सिलींग आणि टेबल फॅनवर तुम्हाला 30 ते 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. यासोबतच एक्स्झॉट फॅनवर सुद्धा तुम्हाला डिस्काऊंट मिळू शकतो.