Amazon Smartphone Upgrade Days Sale: ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेजॉनवर सुरु झाला सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्स खरेदीवर मिळणार जबरदस्त सूट
Amazon Smartphone Upgrade Sale (Photo Credits: Amazon Official Page)

अॅमेजॉन इंडियावर (Amazon India) आजपासून स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल (Smartphone Upgrade Days Sale) सुरु झाला आहे. हा सेल 27 मार्च ते 30 मार्चपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये तुमच्या आवडत्या अशा अनेक ब्रँडेड स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट मिळत आहे. या सेलमध्ये 40 स्मार्टफोन्सवर टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट EMI, मोबाईल इंश्यूरन्स प्लान, कॅशबॅक आणि अन्य डिस्काउंट मिळत आहे. त्याशिवाय मोबाईल संबंधित एक्सेसरिज खरेदी केल्यास 80% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

अॅमेजॉनच्या स्मार्टफोन अपग्रेड सेलमध्ये सॅमसंग, नोकिया, रियलमी, रेडमी, वनप्लस सारख्या अन्य ब्रँडेड फोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. SBI कार्डवरुन खरेदी करणा-या ग्राहकास 10%चा त्वरित डिस्काउंट मिळत आहे.

Samsung Galaxy M51

7000mAh बॅटरी असलेल्या या स्मार्टफोन या सेलमध्ये 21,749 रुपयांमध्ये मिळत आहे. याची मूळ किमत 28,999 रुपये आहे.हेदेखील वाचा- तब्बल 7 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo कंपनीचा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन!

Xiaomi Redmi 9

शाओमीचा हा फोन 8799 रुपयांत मिळत आहे. या फोनची मूळ किंमत 10,999 रुपये आहे. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात 6.53 इंचाची वॉटरड्रॉप नॉट डिस्प्ले आहे.

OPPO A15

ओप्पोच्या या स्मार्टफोनची मूळ किंमत 12,999 रुपये आहे. मात्र या सेलमध्ये हा स्मार्टफोन 9,999 रुपयांत मिळत आहे. यात 4230mAhची बॅटरी देण्यात आली आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी प्लस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये डार्क मोडचा पर्याय देण्यात आला असून फोनची बॉडीची डिझाईन 3डी कर्व्ड आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा, दुसरा लेन्स 2 मेगापिक्सलचा आणि तिसरा लेन्स 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 9 Pro Max

या स्मार्टफोनची मूळ किंमत 18,999 रुपये आहे. जो या सेलमध्ये 14,999 रुपयात मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये 64MP चा क्वाड रियर कॅमेरा दिला आहे. शाओमीच्या रेडमी नोट 9 मॅक्स मध्ये 6.67 इंचाचा एफएचडी+डॉट डिस्प्ले देण्यात आला असून त्यात 2400x1080 इतके त्याचे रिजोल्यूशन आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G चिपसेट दिला आहे. तर 5,020mAh च्या बॅटरी सह 33W चा फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे.