तब्बल 7 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo कंपनीचा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन!
Oppo Find X2 (Photo Credit: Twitter)

प्रीमियम स्मार्टफोन (Premium Smartphone) खरेदी करण्याच्या विचार करणाऱ्यांसाठी ओप्पो (Oppo) कंपनीने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ओप्पोने आपला प्रीमियम स्मार्टफोन फाइंड एक्स 2 च्या (Oppo Find X2) किंमतीत मोठी कपात केली आहे. ओप्पो फाइंड एक्स 2 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी जून महिन्यात लॉन्च झाला होता. त्यावेळी या स्मार्टफोनची किंमत 64 हजार 990 रुपये होती. मात्र, आता या स्मार्टफोनच्या किंमतीत 7 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे स्मार्टफोन चाहत्यांना ओप्पो फाइंड एक्स 2 खरेदी करण्यासाठी 57 हजार 990 रुपये द्यावा लागणार आहेत.

ओप्पो फाइंड एक्स 2 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा क्वाड एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रीफ्रेश दर 120 हर्ट्झ आहे. स्क्रीन संरक्षणासाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 वापरला गेला आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एड्रेनो 650 जीपीयू सपोर्ट करतो. ओप्पो फाइंड एक्स 2 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड कलरओएस 7.1 वर कार्य करेल. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरदेखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा- OnePlus Nord ला टक्कर देण्यासाठी Moto G100 5G लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत

ओप्पो फाइंड एक्स 2 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 48 एमपी आहे. या व्यतिरिक्त, 12 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 13 एमपी टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे.. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरबॅकसाठी फोनमध्ये 4 हजार 200 एमएएच बॅटरीचा समावेश करण्यात आल आहे, जी 65 डब्ल्यू सुपरव्हीओसी फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार, सुपरव्हीओसी फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने फोनची बॅटरी 10 मिनिटांत 40% तर, 38 मिनिटांत पूर्ण चार्ज केली जाऊ शकते.