OnePlus Nord ला टक्कर देण्यासाठी Moto G100 5G लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Motorola | (Photo Credits: Motorola)

Motorola कंपनीने स्मार्टफोनच्या दुनियेत झपाट्याने पाऊल टाकत आहे. कंपनी खासकरुन 5G टेक्नॉलॉजी मध्ये मागे राहू पाहत नाही आहे. हेच कारण आहे की, कंपनीने प्रथम Moto 5G स्मार्टफोन अफोर्डेबल प्राइस पॉइंटमध्ये उतरवला. आता मोटोरोलाने Moto G100 स्मार्टफोन युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा मोटोरोला कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Motorola Edge D चे रिब्रँन्ड वर्जन आहे. जो गेल्या वर्षात चीनमध्ये लॉन्च केला होता. दरम्यान, भारतासह अन्य ठिकाणी हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार याबद्दल स्पष्ट करण्यात आलेले नाही. Moto G100 स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 499.99 युरो (जवळजवळ 42,700 रुपये) आहे. फोन तीन कलर ऑप्शन Iridescent Sky, Iridescent Ocean आणि Slate Grey मध्ये येणार आहे. Moto G100 स्मार्टफोनची टक्कर OnePlus Nord सोबत होणार आहे.

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास Moto G100 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. फोनचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. जो HDR10 सपोर्ट करणार आहे. फोन Qualcomm Snapdragon 870 processor ला सपोर्ट करणारा आहे. जर फोटोग्राफी बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP चा असणार असून 2MP चा डेप्थ सेंसर, 16MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ToF सेंसरचे सपोर्ट मिळणार आहे. सेल्फीसाटी दोन पंच होल कॅमेरा दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 16MP चा असणार आहे. तर अन्य एक 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स दिली गेली आहे.(Lenovo चा नवा गेमिंग स्मार्टफोन येत्या 8 एप्रिलला होणार लॉन्च, जाणून घ्या संभाव्य फिचर्स) 

Moto G100 स्मार्टफोन 5,000mAh ची बॅटरी सपोर्टसह येणार आहे. फोन 20W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करणार आहे. जर सॉफ्टवेअर बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये अॅन्ड्रॉइड 11 आउट ऑफ द बॉक्स वर काम करणार आहे. स्मार्टफोन एक साइड माउंडेट फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट दिला गेला आहे. या व्यतिरिक्त 3.5mm हेडफोन जॅक, डेडिकेट गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळणार आहे.  फोनमध्ये Samsung DeX मोड प्रमाणे Reddy For कनेक्टिव्हिटी फिचर दिले गेले आहे.