Lenovo चा नवा गेमिंग स्मार्टफोन येत्या 8 एप्रिलला होणार लॉन्च, जाणून घ्या संभाव्य फिचर्स
Lenovo Legion 2 Pro (Photo Credits-Twitter)

दिग्गज टेक कंपनी Lenovo ने पोस्टर जाहीर करत त्यांचा आगामी नवा गेमिंग स्मार्टफोन Legion 2 Pro च्या लॉन्चिंग तारखेबद्दल खुलासा केला आहे. हा स्मार्टफोन 8 एप्रिलला चीन मधील बाजारात उतरवला जाणार आहे. परंतु पोस्टरमध्ये या गेमिंग स्मार्टफोनच्या फिचर्ससह किंमतीबद्दल कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, यामध्ये 65W फास्ट चार्जर दिला जाणार आहे. तसेच डुअल युएसबी पोर्ट सुद्धा मिळणार आहे. तर उत्तर परफॉर्मेन्ससाठी Snapdragon 888 प्रोसेसर आणि 16GB रॅम मिळणार आहे. अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास Legion 2 Pro मध्ये डुअल Turbo कुलिंग फॅनसह OLED डिस्प्ले आणि पॉप अप कॅमेरा दिला जाणार आहे.(Twitter मध्ये लवकरचं येत आहे नवीन फिचर; आता ट्विटमध्येचं पाहू शकता YouTube व्हिडिओ)

Legion 2 Pro च्या किंमतीबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. अशी अपेक्षा आहे की, कंपनी हा अपकमिंग स्मार्टफोनची किंमत प्रीमियम रेंजमध्ये ठेवू शकते. या डिवाइससाठी काही कलर ऑप्शन सुद्धा युजर्सला मिळू शततात.(भारतामध्ये PUBG Mobile India पुन्हा लॉन्च होणार? मेकर्सनी सुरु केल्या हालचाली, Investment and Strategy Analyst पदासाठी होत आहे भरती) 

तर गेल्या वर्षात लॉन्च झालेल्या Lenovo Legion Duel साइड पॉप-अप सेल्फी कॅमेरासह लॉन्च करण्यात आला होता. अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Legion हा अॅन्ड्रॉइड 10 ओएससह ZUI12 उतरवला गेला आहे. स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 865+ चिपसेटवर काम करणार आहे. फोन खास फिचरच्या आधारावर यामध्ये Legion Assistant दिला गेला आहे. जे वर्च्युअल गेमपॅडला कंट्रोल करणार आहे. या फोनमध्ये 6.65 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. याचा स्क्रिन रेज्यॉल्यूशन 2340X1080 पिक्सल आहे. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट दिला गेला आहे.