सध्या भारतात ऑनलाईन शॉपिंग साईट्समध्ये अॅमेझॉन (Amazon) कंपनी अग्रगण्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने ग्राहकांसाठी इतक्या सुविधा, नवनवीन सेल. सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे अॅमेझॉनला टक्कर देणे फार अवघड आहे. अॅमेझॉनने सुरु केलेली आणि अल्वधीत लोकप्रिय झालेली एक सेवा म्हणजे अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime). अॅमेझॉन प्राईम ग्राहकांसाठी कंपनी विविध सेवा पुरवण्यासाठी नेहमीच तत्पर असते. आताही अॅमेझॉन प्राईम युजर्ससाठी एक खुशखबर आहे. आता कंपनीकडून प्राईम मेंबर्सना केवळ एका दिवसात डिलिव्हरी मिळणार आहे. नुकतीच याबाबत घोषणा केली गेली आहे.
आधी अॅमेझॉन प्राईम युजर्सना दोन किंवा तीन दिवसांत डिलिव्हरी मिळत असे. मात्र आता तुम्ही जर का अॅमेझॉन प्राईम युजर्स असाल, तर तुम्ही ऑर्डर केलेली वस्तू तुम्हाला केवळ एका दिवसात मिळणार आहे. याबाबत कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी ब्रायन ओल्स्वस्की (Brian Olsavsky) यांनी माहिती दिली आहे. कंपनी आपला व्यवसाय वाढवत आहे, त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी एका दिवसात डिलिव्ह ही सुविधा सुरु होणार आहे. मात्र, भारतातल्या प्राईम मेंबर्ससाठी ही सुविधा केव्हापासून सुरू होणार याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. (हेही वाचा: Amazon मध्ये भारतीयांसाठी बंपर नोकरभरती, अमेरिका, जर्मनी पाठोपाठ भारतीय तरूणांना नोकरीची मोठी संधी)
जपानसह अन्य काही देशांमध्ये कंपनीने ही सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे. सध्या कंपनी 20-25 टक्के उत्पादने, अतिरिक्त शुल्कासह एका दिवसात डिलिव्हरी करते. मात्र कंपनी हे प्रमाण वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अॅमेझॉनने 800 मिलियन डॉलर्स खर्च करण्याची तरतूद केली आहे.