Amazon मध्ये भारतीयांसाठी बंपर नोकरभरती, अमेरिका, जर्मनी पाठोपाठ भारतीय  तरूणांना नोकरीची मोठी संधी
Amazon Representational Asset (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

आजचं युग हे डिजिटल मीडियाचं आहे. त्यामुळे प्रामुख्याने तुम्ही इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट  क्षेत्रातील असाल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ई कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनींपैकी एक असणार्‍या अमेझॉन ( Amazon India)  सोबत काम करण्याची संधी चालून आली आहे. भारतामध्ये अमेझॉन कंपनीने सुमारे 1300 पदांसाठी नोकरभरती होणार असल्याची माहिती दिली आहे. चीनमधील कार्यालयाच्या तब्बल तीनपट अधिक जागांसाठी भारतामध्ये नोकरभरती होणार आहे. यापूर्वी अमेरिका, जर्मनी या देशामध्ये अमेझॉनकडून ( Amazon) इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्यात आली आहे.

अमेझॉनने चीनमध्ये 467, जापान मध्ये 381, ऑस्ट्रेलिया मध्ये 250 आणि सिंगापुर मध्ये 174 जागांसाठी भर्ती होणार असल्याचं सांगितलं आहे. अमेझॉन सध्या ई-कॉमर्स आणि क्लाऊडबिजनेस वेंचर्सला वाढवण्यासाठी खास प्रयत्न करत आहे. 2018 मध्ये सुमारे 60,000 नोकरभरती  करण्यात आली आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती  ?

ई-कॉमर्स आणि क्लाउड बिजनेस (AWS) वेंचर्स वाढवण्याचं लक्ष्य असलेल्या अमेझॉन कंपनीमध्ये पेमेंट, कंटेंट (प्राइम वीडियो), व्हॉईस असिस्टेंट (अलेक्सा), फूड रिटेल आणि कंझ्युमर सपोर्ट यासाठी मोठ्या प्रमाणात भरती  होणार आहे. अमेझॉनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट, प्रोडक्ट अ‍ॅन्ड मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, प्रोडक्ट मॅनेजमेंट, मशीन लर्निंग, क्वालिटी चेक, सप्लाई चेन, कंटेंट डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स, स्टूडियो अ‍ॅन्ड फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

मागील वर्षी अमेझॉनच्या अलेक्सावर ऑल इंडिया रेडियो (AIR) च्या विविध भारती आणि 14 इतर प्रादेशिक भाषांमधील रेडिओ चॅनेल्स मिळाले होते. भारतामध्ये फूड-रिटेलिंग प्रोडक्ट्स वर अमेझॉन कंपनी सुमारे 500 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.