Amazon Raksha Bandhan Sale मध्ये Redmi, One Plus सह 'या' गॅजेट्सवर दिली जातेय आकर्षक ऑफर्स आणि डील्स
Amazon Representational Asset (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

Amazon ने रक्षाबंधनासाठी खास सेल आणला आहे. त्यानुसार फॅशन, ब्युटी, स्मार्टफोन, टीव्ही, होम डेकोर, किचन अप्लांयसेस, चॉकलेट, एक्ससरिजस, पर्सनलाइज्ड गिफ्ट कार्ड्स आणि अन्य गोष्टींचा या सेलमध्ये दमदार ऑफर आणि डील्स मिळणार आहे. राखींसह गिफ्ट हॅम्पर्स सुद्धा ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर येत्या 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या भावडांना गिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे.(Asus ROG 5s: Asus कंपनीचा ROG 5s स्मार्टफोन लवकरच बाजारात, जाणून घ्या या मोबाईलची जबरदस्त वैशिष्ट्ये)

Redmi Note 10 Pro Max च्या 6GB वेरियंटला 19,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. डिवाइसमध्ये 6.67 इंचचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G द्वारा संचालित असून जो 6GB वेरियंटसह येणार आहे. हा 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह येणार आहे. फोनमध्ये 33W फास्ट चार्जरसग 5020mAh ची बॅटरी दिली आहे.

OnePlus Nord CE 5G अॅमेझॉन राखी स्टोरवर 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेजॉल्यूशन 2400X1080 पिक्सल आहे. स्मार्टफोनसाठी 64MP+8MP+2MP चा कॅमेरा दिला आहे. वनप्लस नर्ड सीई क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750 5G द्वारे संचलित असून जो 6 जीबी रॅमसह येणार आहे. स्मार्टफोनमध्ये Warp Charge 50T पॉवर एडॉप्टरसह येणार आहे.(लॉन्चिंगपूर्वी Xiaomi Redmi 10 चे स्पेसिफिकेशन लीक, जाणून घ्या स्मार्टफोनच्या प्रत्येक अपडेट बद्दल अधिक)

त्याचसोबत राखी स्टोरवर Echo Dot 3rd जेनरेशन 2999 मध्ये उपलब्ध आहे. डिवाइसचा वापर करुन तुम्ही अॅलेक्साला म्युझिक, न्यूज, कम्पेटिबल स्मार्ट होम डिवाइस कंट्रोल करण्यास सांगू शकता. तसेच Sony Bravia 55 इंचाचे 4K अल्ट्रा HD स्मार्ट LED गुगल TV kD-55X80AJ 4K अल्ट्रा एचडी 3840X2160 पिक्सल आणि 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणार आहे. यामध्ये सेटअप बॉक्स, ब्लू-रे प्लेअर आणि गेमिंग कंसोलला जोडण्यासाठी 4 HDMI पोर्टची कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. स्मार्ट टीव्ही फिचर्समध्ये गुगल टीव्ही, वॉइस सर्च, गुगल प्ले, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, एचडीआर गेमिंगचा समावेश आहे. हे अॅमेझॉनवर तुम्हाला 78,990 रुपयात खरेदी करता येणार आहे.