Amazon Great Indian Sale 2020: 19 जानेवारीपासून सुरु होणार अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल; मिळेल 80 टक्क्यांपर्यंत सूट, पहा ऑफर्स
Amazon (Photo Credit: TNW)

नवीन वर्षात फ्लिपकार्टने एका महासेलचे आयोजन केले होते. आता ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुन्हा एकदा अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल (Amazon Great Indian Sale 2020) सुरू होणार आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाचा हा बहुप्रतिक्षित 'ग्रेट इंडियन सेल' परत आला असून, 19 ते 22 जानेवारी 2020 दरम्यान या सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलद्वारे जनतेला बचत करण्याची अजून एक संधी उपलब्ध होत आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम वापरकर्त्यांसाठी हा सेल, 12 तास आधीच म्हणजे 18 जानेवारी दुपारी 12 वाजता सुरू होईल.

या सेलमध्ये स्मार्टफोन, किचन, फॅशन, सौंदर्य यासह अनेक वस्तूंवर सूट मिळणार आहे. यावेळी अ‍ॅमेझॉनने स्टेट बँक ऑफ इंडियाशी हातमिळवणी केली आहे. अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये एसबीआयच्या क्रेडिट कार्डमधून खरेदी केल्यास, आपल्याला 10% अतिरिक्त सूट देखील मिळेल. एचएसबीसीच्या कार्डवर घरगुती उपकरणे खरेदी करताना 10% सूट मिळेल. येस बँक आणि इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन रेफ्रिजरेटरच्या खरेदीवर 10% सूट असेल. (हेही वाचा: Amazon Prime युजर्ससाठी खुशखबर; कंपनी घेऊन आहे ही मोठी सुविधा)

अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान स्मार्टफोनवर 40 टक्के सूट मिळेल. शाओमी, रियलमी, ओप्पो, सॅमसंग, व्हिवो आणि एलजी ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर आपणास उत्तम सवलत मिळेल. टॉप ब्रँडला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 16,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. महिन्याला 833 रुपयांच्या आरंभिक ईएमआयवर हा फोन घेता येऊ शकेल. या सेलमध्ये तुम्हाला लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 35 हजार रुपये आणि कॅमेरा खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपयांची सूट मिळेल. या सेलमध्ये तुम्ही 299 पासून हेडफोन आणि स्पीकर्स देखील खरेदी करू शकता. फॅशन सौंदर्य या श्रेणीत 80% सुटेल मिळेल.