What is TikTok: स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियावर TikTok व्हिडिओंनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आपल्यापैकी अनेकांनी TikTok व्हिडिओ बनवले असतील. तुम्हीच नव्हे अवघ्या दुनियेला TikTokने वेढ लावले आहे. अशा या TikTok बद्दल आपल्याला बरेच माहिती असेल. परंतू, TikTok वापरणे हे किती धोकादायक आहे हे कादचित आपण जाणत नसाल. मद्रास उच्च न्यायालयाने TikTok वर बंदी घालावी असे आदेश सरकारला नुकतेच दिले. न्यायालयाचे आदेश आल्यानंतर TikTok पुन्हा एकदा चर्चेत आले. त्याच्या बऱ्या वाईट गोष्टींबद्दल अनेक कहाण्यास समोर येऊ लागल्या. म्हणूनच जाणून घेऊया नेमके काय आहे TikTok तरुणाई, अबालवृद्ध आणि अवघे जगच का आहे त्याच्यावर इतके फिदा.
काय आहे TikTok ?
टिक टॉक अॅप (TikTok App) ही चीनी बनावटीची जादू आहे. वास्तवात टिक टॉक (TikTok) हे एक सोशल मीडिया अॅप्लिकेशव आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स छोटे छोटे व्हिडिओ (15 सेकंदांपर्यंत) बनवू शकतात. महत्त्वाचे म्हणजे हे व्हिडिओ शेअरही करता येतात. 'बाईट डान्स' नावाच्या कंपनीकडे TikTok चा स्वामित्व हक्क (कॉपिराईट अधिकार) आहेत. बाईट डान्स कंपनीने 2016 मध्ये हे अॅप तयार आणि लॉन्च केले. अल्पावधीतच हे अॅप जगभरात प्रसिद्ध झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये सर्वाधिक डॉऊनलोड करण्यात आलेले TikTok हे सर्वोच्च अॅप ठरले. अमेरिकेत TikTok वर तब्बल 40 कोटी रुपयांचा दंडही लागला आहे.
गूगल प्ले स्टोर TikTok ची ओळख काय सांगते पाहा
गूगल प्ले स्टोर TikTok अॅपची ओळख 'Short videos for you' (आपल्यासाठी छोटे व्हिडिओ) अशी करुन दिली आहे. प्ले स्टोरवर टीक टॉक परियचयाबाबत लिहिले आहे की, मोबाईलच्या माध्यमातून छोटे व्हिडिओ बनविण्याचे TikTok हे महत्त्वाचे आणि सोपे माध्यम आहे. यात कोणतीही फसवेगिरी नाही. तसेच, हे वास्तव असून त्याला कोणतीही मर्यादा नाही. TikTok वर या आणि केवळ 15 मिनिटांमध्ये तुम्ही जगाला तुमची स्वत:ची कहाणी सांगा.
भारतामध्ये TikTok जोरदार प्रसिद्ध
भारतामध्ये TikTok डाऊनलोड करण्याचे प्रमाण तब्बल 100 मिलियनहून अधिक असल्याची माहिती इंटरनेटवर मिळते. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रतिमहिना सुमारे 20 मिलियन भारतीय TikTok वापरतात. भारतीयांमध्ये TikTokच्या लोकप्रियतेचा अंदाज या संख्येवरुनच येऊ शकतो. गूगल प्ले स्टोरवर तब्बल आठ मिलियन लोकांनी TikTok रिव्ह्यू केला आहे. विशेष म्हणजे टिक टॉक व्हिडिओ बनविण्याचे सर्वाधिक प्रमाण हे खेडेगाव आणि छोट्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सहा-सात वर्षांच्या मुलांपासून ते वृद्ध नागरिक आणि मुली महिलांसोबतच अवघ्या तरुणाईलाही TikTok ने वेढ लावले आहे. (हेही वाचा, भारतात TikTok बंद होण्याची शक्यात, मद्रास उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश)
ओरिजन TikTok व्हिडिओ कसे ओळखाल?
तुम्ही जर फेसबुक, ट्विटर वापरत असाल तर, तुमच्या अकाऊंटला अधिकृततेचा दर्जा मिळवण्यासाठी 'ब्लू टीक' दिली जाते. ही टीक मिळविणसाठी फेसबुक आणि ट्विटरकडे बरेच प्रयत्न करावे लागतात. TikTok बाबत मात्र हे चित्र काहिसे वेगळे आहे. TikTok वर अधिकृत अकाऊंट असलेल्या मंडळींची संख्या मोठी आहे. TikTok वर अधिकृततेचा दर्जाबाबत ऑरेंज टीक केली दिली जाते. तसेच, ज्यांना TikTok कडून ऑरेंज टीक मिळते त्यांच्या अकाऊंटवर 'पॉप्यूलर क्रिएटर' असे लिहिलेले पाहायला मिळते. कोणाचेही TikTok अकाऊंट पाहिले तर त्यावर किती 'हृदय निशाणी'(Hearts) मिळाल्या आहेत त्यावरुन तो व्हिडिओ किती लोकांना आवडला हे समजते. अनेकांनी तर TikTok हे आपल्या कमाईचेच साधन बनवले आहे.
TikTok वापरण्यासाठी वयाची 13 वर्षे पूर्ण असायला हवीत
गूगल प्ले स्टोरने म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने वयाची 13 वर्षे पूर्ण केली आहेत असेच लोक TikTok वापरु शकतात. भलेही गूगल प्लेस्टोरने असा नियम सांगितला असला तरी, वास्तवात मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. वापरकर्त्यांचे व्हिडिओ पाहता अनेकदा 13 वर्षांपेक्षाही कमी वयाची मुले TikTok वापरताना दिसतात. व्यक्तिगततचेच्या दृष्टीकोनातून हे धोकादायक आहे. कारण, यात केवळ दोनच प्रायव्हसी सेटींग्ज केली जातात. एक पब्लिक आणि दुसरी ओनली म्हणजेच तुम्ही व्हिडिओ पाहणाऱ्यांना फिल्टर लाऊ शकत नाही. एकतर हे व्हिडिओ तुम्ही स्वत: पाहू शकता किंवा ज्याच्याकडे इंटरनेट आहे असा कोणताही व्यक्ती TikTok व्हिडिओ पाहू शकतो. जर एखाद्या युजरला आपले स्वत:चे TikTok अकाऊंट डिलिट करायचे असेल तर तो तसे करु शकत नाही. त्यासाठी TikTok कडे तशी विनंती करावी लागते. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारची अॅप ही युजर्सची व्यक्तिगत महिती गोळा करतात असा अनेकदा आरोप होते. बऱ्याचदा त्यात तथ्यही आढलून आले आहे.