Akshay Tritiya offer(file image)

Akshaya Tritiya bumper offer on Amazon & Flipkart: यंदाची अक्षय्य तृतीया खास करण्यासाठी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्स घेऊन आले आहेत. ह्यात स्मार्टफोन्ससहित काही आकर्षक गॅजेट्सवरही विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत. आजकाल मोबाईल्सला सोन्याइतकेच महत्त्व आल्यामुळे तुम्हाला अक्षय्य तृतीयाला काही आकर्षक स्मार्टफोन्स घ्यायची इच्छा असेल, तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये घेता येतील, असे स्मार्टफोन्स ह्या ऑफर्समध्ये मिळतील.

स्मार्टफोन्सचा विचार केला असता सध्या वनप्लस, शाओमी, रियलमी, सॅमसंग या स्मार्टफोन्सची बाजारात चलती आहे. त्याचबरोबर आयफोन नेहमी आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे  अ‍ॅमेझॉनने अशा काही खास स्मार्टफोन्स तसेच आयफोनवर विशेष ऑफर्स ठेवल्या आहेत.  पाहा कोणत्या आहेत अ‍ॅमेझॉनवरील विशेष ऑफर्स...

Akshaya Tritiya 2019: यंदा अक्षय्य तृतीया दिवशी सोन्याच्या दागिन्यांऐवजी गोल्ड बॉन्ड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये करा गुतंवणूक

  1. वनप्लस 6T(OnePlus 6T):

    वनप्लस 6टी चा 8GB आणि 128GB हा स्मार्टफोन तुम्हाला अ‍ॅमेझॉनवरील विशेष डिस्काउंटमध्ये 32,999 रुपयांत मिळत आहे. तसेच 8GB+256GB आणि 10GB+256GB वनप्लस 6टी स्मार्टफोन अनुक्रमे 36,999 रुपये आणि 46,999 रुपयांत मिळत आहे. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफर मध्ये ग्राहकांना 11,400 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळत आहे.

  2. अ‍ॅप्पल आयफोन X (Apple iPhone X):

    64GB असलेला हा आयफोन ग्राहकांना 69,999 रुपयात मिळत आहे. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफरमध्ये 11,400 रु. अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळत आहे. ह्या आयफोन खास गोष्ट म्हणजे ह्यात 8 इंचाची सुपर रेटिना OLED डिस्प्ले देण्यात आला असून, ह्यात 7MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  3. सॅमसंग गॅलक्सी M20 (Samsung Galaxy M20):

    ह्या ऑफरचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे सॅमसंग गॅलक्सी एम20 हा स्मार्टफोन. ह्या स्मार्टफोनच्या 3GB रॅमची किंमत 9,990 रु. आणि 4GB रॅमची किंमत 11,990 रुपये इतकी आहे.

  4. शाओमी रेडमी 6A (Xiaomi Redmi 6A):

    2GB रॅम असलेल्या ह्या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला 5,350 रु. च्या किंमतीत मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आण 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

आता पाहूया फ्लिपकार्टवरील धमाकेदार ऑफर्स:

  1. रियलमी 2Pro (Realme 2Pro):

    4GB रॅम आणि 8GB रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 13,990 रु. आणि 15,990 रुपये इतकी आहे. ह्यात 3500mAh ची बॅटरी क्षमता देण्यात आली आहे.

  2. रेडमी नोट 5 प्रो (Redmi Note 5 Pro):

    हा स्मार्टफोन तुम्हाला डिस्काउंटमध्ये 10,990 रुपयांत मिळत आहे. तर 6GB रॅम असलेल्या रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोनची किंमत 13,999 रु. इतकी आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 20MP सेल्फी कॅमेरा, ड्यूल कॅमेरा आणि 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

  3. ह्या स्मार्टफोन्सवरील ऑफर्ससोबत फ्लिपकार्ट अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरिजवर UPTO 80% डिस्काउंट मिळत आहे. ह्यात गेमिंग लॅपटॉप्स, कॅमेराज, मोबाईल अ‍ॅक्सेसरिज, पॉवर बँक्स, टॅबलेट्स, ऑडियो स्पीकर्स ह्यांचा समावेश आहे. ह्यात गेमिंग लॅपटॉप्स किंमत 46,990 रुपयांपासून सुरु होत असू, हेडफोन्स आणि स्पीकर्वर UPTO 70% डिस्काउंट मिळत आहे. तसेच ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कॅनन आणि निकॉन DSLR कॅमेराजवर देखील विशेष ऑफर्स देण्यात आली असून त्यांची किंमत साधारण 19,999 रुपयांपासून आहे.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या ह्या आकर्षक ऑफर्सचा जर तुम्ही अजून लाभ घेतला नसेल, तर त्वरित ह्या संकेतस्थळांना भेट द्या आणि तुमचा आवडता स्मार्टफोन किंवा अन्य गॅजेट्स घेऊन तुमची अक्षय्य तृतीया खास बनवा.