OPPO A1K भारतात लॉन्च; जाणून घ्या या बजेट स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत
Oppo A1k (Photo Credits: Oppo Official Site)

ओपो (Oppo) या स्मार्टफोन कंपनीने OPPO A1K  हा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, पेटीएम मॉल इत्यादी शॉपिंग साईट्सह हा स्मार्टफोन तुम्हाला ऑफलाईन देखील खरेदी करता येईल. OPPO A1K हा बजेट फोन असून याची किंमत फक्त 8 हजार 490 रूपये आहे. (Oppo F11 Pro Avengers भारतात लॉन्च; 'अॅमेझॉन' वर खरेदी करण्याची खास संधी)

OPPO A1K चे फिचर्स:

या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले 19:5:9 या आस्पेस्ट रेशोसह देण्यात आला आहे. यात मिडियाटेकचा हेलीओ पी 22 हा प्रोसेसर आहे. 2 जीबी रॅमसह 32 जीबी ची स्मार्टफोनची स्टोरेज क्षमता आहे. यात 4,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. यात 8 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी यात 4जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्ल्यु-टूथ या सुविधा देण्यात आल्या असून यात 3.5 एमएमचा हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे.