स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo) एवेंजर्स एंडगेम (Avengers Endgame) सिनेमाच्या निमित्ताने oppo F11 Pro स्मार्टफोनचे स्पेशल एडिशन लॉन्च करत आहे. आज हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. लिमिटेड एडिशन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ग्लॉसी फिनिशिंगसह निळ्या रंगात उपलब्ध होणार आहे. तर यावर लाल रंगाने एवेंजर्सचा लोगो बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर या फोनसोबत थर्मो प्रिंटेड एवेंजर्स लोगो आणि स्टाम्प्ड कलेक्टर बॅच देखील देण्यात येणार आहे.
स्मार्टफोनची किंमत:
मलेशियात हा स्मार्टफोन लॉन्च झाला असून तिथे याची किंमत 1,399 मलेशियन रिंगिट म्हणजेच 23,670 रुपये आहे. मात्र भारतात हा स्मार्टफोन सुमारे 22,000 रुपयांत उपलब्ध होईल. हा फोन तुम्ही एक्सक्युझिव्हली अॅमेझॉनवरुन खरेदी करु शकता. ग्राहकांना या फोनसह 'कॅप्टन अमेरिका शिल्ड' असलेला एक स्मार्टफोन केस देखील मिळणार आहे. ही शिल्ड बाहेरच्या बाजूला खेचून त्याचा उपयोग स्टँडसारखा करता येऊ शकतो.
पहा व्हिडिओ:
स्मार्टफोनचे फिचर्स:
Mediatek Helio P70 ऑक्टा-कोर प्रोसेसर असलेल्या ओप्पो एफ11 प्रो अवेंजर्स एंडगेम या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच फुलएचडी प्लस पॅनासोनिक डिस्प्ले सह देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम देण्यात आला असून हा फोन कलर ओएस 6.0 वर चालतो. स्पेशल एडिशन असलेल्या या फोनमध्ये 128GB चा इंटरनल स्टोरेज देण्यात आला असून ही मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येईल. यात 16MP चा पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रियर साइडमध्ये 48MP प्रायमरी आणि 5MP सेकेंडरी सेटअप असलेला ड्युल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,020 mAh ची बॅटरी देण्यात आली असून यात VOOC फास्ट चार्जिंग सपॉर्ट देखील मिळेल.