प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Akshaya Tritiya 2019: यंदा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात. परंतु काही आर्थिक तज्ञांच्यानुसार येत्या अक्षय्य तृतीयेला सोन्यावर उत्तम रिर्टन्स मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेयरखान कॉमट्रेड मधील कमोडिटिज फंडामेंटल रिसर्जचे एवीपी प्रवीण सिंह यांनी असे म्हटले आहे की, अमेरिकेत सोन्याला उत्तम रिर्टन्स भारतात सध्या मिळत नाहीत. परंतु येत्या काळात सोन्यावर उत्तम रिटर्सन्स मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

तर नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी तुम्ही गोल्ड बॉन्ड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये गुतंवणूक करु शकता असे म्हटले आहे. त्यामुळे पेपर गोल्ड बॉन्ड किंवा ईटीएफ मध्ये गुंतवणूक करणे येत्या काळात फायदेशीर ठरणार आहे. परंतु सध्या गोल्ड बॉन्डमध्ये लिक्विडिटी संबंधित काही समस्या आहे. तर गोल्ड बॉन्डमध्ये तुम्ही जर गुंतवणूक करणार असल्यास ती दीर्घ काळासाठी केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे.(Gold Rate: अक्षय्य तृतीया दिवशी सोनं खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय?)

तर सोन्याचे दर नेहमी बदलत असतात. त्यामुळे दीर्घ काळासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्याच्यावर उत्तम रिर्टन्स मिळू शकतात.