सोने दर (संग्रहित, संपादित प्रतिमा)

6 May Gold Price in Maharashtra: अक्षय्य तृतीया (Akshya Tritiya) यंदा 7 मे दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लक्ष्मी (Laxmi) आणि विष्णूच्या (Vishnu) प्रतिकात्मक पूजेमध्ये सोन्याची खरेदी करण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी केलेले दान अक्षय दान राहते असा समज आहे. अमेरिकन बाजरात सोन्याचा भाव स्थिर झाल्याने आता भारतामध्येही सातत्याने सोन्याचा भाव घसरत आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही सोन्याची खरेदी करणार असाल तर जाणून घ्या आज (6 मे) दिवशी सोन्याचा भाव किती?

मुंबई, पुण्यात 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर किती?

गोल्ड प्राईज इंडिया.कॉमच्या वेबसाईटनुसार मुंबईतील सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे. आज मुंबई,पुण्यामध्ये सोन्याचा भाव 24 कॅरेट सोन्यासाठी ₹32,324 आणि 22 कॅरेट सोन्यासाठी ₹30,764 मोजावे लागणार आहेत. Gold Purity Guide: अक्षय्य तृतीया दिवशी Gold Coin, वळं, दागिने विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 24k, 22k आणि 18k सोन्यातला फरक

सध्या अक्षय्य तृतीया सोबतच लग्नसराईचाही मोसम असल्याने यंदा सोने खरेदीकडे गर्दी होणार आहे.