Flipkart Summer Carnival Sale: फ्लिपकार्ट समर कार्निव्हल सेल अंतर्गत 'या' स्मार्टफोन्सवर मिळत आहे घसघशीत सूट
Flipkart Summer Sale Kicked-off (Photo Credits: Flipkart)

ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर आजपासून Summer Carnival Sale सुरु झाला आहे. हा सेल अंतर्गत काही स्मार्टफोन्सवर भारी डिस्काऊंट ऑफर दिली आहे. या सेल आज 4 मे पासून 7 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स शिवाय गेमिंग कंसोल, ऑडिओ गिअर आणि अन्य डिव्हाईस वर डिस्काऊंट ऑफर दिल्या जात आहे. या सेलअंतर्गत स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावर डिस्काऊंटशिवाय नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंट ऑफर्स आणि बँक ऑफर्स दिल्या जातील. जाणून घेऊया डिस्काऊंट बद्दल... (अक्षय तृतीयेच्या निमित्ताने Flipkartच्या ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स, या उत्पादनांवर मिळणार भारी सूट)

Apple iPhone XR 64GB

Apple iPhone XR च्या 64GB स्टोरेज वेरिएंटवर युजर्सला 17,450 रुपयांवर इंस्टट डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर 59,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. खरेदी करताना एचडीएफसी बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्सला 5,990 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट ऑफर दिला जात आहे. यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही 53,910 रुपयांना खरेदी करु शकाल.

Nokia 6.1 Plus

या सेलअंतर्गत Nokia 6.1 Plus हा स्मार्टफोन 12,999 रुपयांना खरेदी करु शकाल. हा स्मार्टफोन 15,999 रुपये किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरसह तुम्ही खरेदी करु शकता. या खरेदीवर तुम्हाला 11,950 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर दिली जाईल.

या फोनमध्ये 5.8 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रैगन 636 एसओसी चिपसेट देण्यात आला आहे. फोन 4GB रॅम आणि 3,060mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Realme 2 Pro

या सेलमध्ये Realme 2 Pro वर 4,000 रुपयांचा डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. फोन तुम्ही 10,990 रुपयांना खरेदी करु शकता. या फोनमध्ये 4GB वेरिएंटमध्ये भारतात 14,990 रुपये किंमतीत लॉन्च करण्यात आला. याशिवाय या फोनमध्ये 6GB वेरिएंटला एक्सचेंज ऑफरसह 11,950 रुपये किंमतीत खरेदी करु शकाल. हे वेरिएंट 16,990 रुपये किंमतीत लॉन्च करण्यात आले होते.

या फोनमध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी प्लस वाटरड्रॉप नॉच आणि ड्यूल रियर कॅमरा सेटअपसह लॉन्च करण्यात आला होता. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रैगन 660 एसओसी चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे.