एअरटेल कंपनीचा Airtel Black प्लॅन लॉन्च, युजर्सला नव्या ऑफरमध्ये मिळणार धमाकेदार सुविधा
Airtel. (Photo Credits: Twitter)

एअरटेल कंपनीने आपली नवी सर्विस Airtel Black लॉन्च केली आहे. एअरटेल ब्लॅक सर्विसह युजर्सला फायबर, डीटीएच आणि मोबाईल सर्विसेजचे बिल एकाच वेळी भरता येणार आहे. या व्यतिरिक्त या सर्विससोबत युजर्सला प्लॅन्स आपल्या गरजेनुसार कस्टमाइज सुद्धा करण्याची सुविधा असणार आहे. एअरटेलचे असे म्हणणे आहे की, ग्राहकांनी महिन्याच्या विविध ड्यू-डेट्ससाठी मल्टीपल बिल पे करण्यासाठी त्रास होत आहे. रिचार्ज न केल्याने सर्विस बंद केली जाते. त्यामुळे ती सर्विस वापरण्यास त्यांना समस्या येते.(Battlegrounds Mobile India गेम अखेर लॉन्च; जाणून घ्या कसा कराल डाऊनलोड)

एअरटेल ब्लॅक सर्विसची घोषणा करत कंपनीने असे म्हटले की, ग्राहकांना एअरटेल ब्लॅक बनण्यासाटी ग्राहक 2 किंवा त्याहून अधिक सर्विसेज बंडल करु शकतात. यामध्ये फायबर, डीटीएच, मोबइल यांचा समावेश आहे. या सर्व सर्विसेजसाठी एअरटेल ब्लॅकमध्ये सिंगल बिल, एक रिलेशनशिप मॅनेजरसह एक कस्टमअर केअर क्रमांक आणि कोणीतीही समस्या दूर करण्यासाठी प्रॉयरिटी सारखी सुविधा मिळणार आहे.

या युजर्सला विविध बिल पेमेंट्स डेट्स मॅनेज करता येणार आहेत. तसेच कस्टमर केअर IVRs ला नेविगेट करणे किंवा विविध सर्विस प्रोवाइडर्स सोबत इंटरॅक्ट करता येणार आहे. टेलिकॉम कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, कॉल करण्यासाठी 60 सेकंदाच्या आतमध्ये कस्टमर केअर रिप्रेजेन्टेटिव्ह आणि फ्री सर्विस व्हिजिट सारखी सुविधा दिली जाणा आहे. कंपनीने पुढे असे म्हटले की, या सर्विसमुळे युजर्सचा टीव्ही डिसकन्टेक्ट होणार नाही आहे. ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय टीव्ही पाहता येणार आहे. डीटीएच एक बिल सर्विस आहे. एअरटेल ब्लॅकच्या माध्यमातून युजर्सला प्रत्येक सर्विसाठी एक प्लॅन कस्टामाइज करता येणार आहे. त्यानंतर त्यांना बिलिंगमध्ये बंडल करता येईल.(Reliance AGM 2021: रिलायन्स जिओकडून सर्वात स्वस्त JioPhone Next स्मार्टफोनची घोषणा; 'या' दिवशी होणार उपलब्ध)

एअरटेलने आता चार प्लॅन लाइव्ह केले असून असे म्हटले की, कस्टमर्सला आपल्या गरजेनुसार हे प्लॅन कस्टमाइज करता येणार आहेत. या प्लॅनची रेंज 998 रुपये ते 2099 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. या बंडलमध्ये युजर्सला DTH+Mobile, Fibre+Mobile आणि All in One प्लॅनचा समावेश करता येणार आहे. प्लॅन हे एअरटेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरुन पाहता येणार आहेत.