JioPhone Next (Photo Credits: Reliance)

रिलायन्स इंडस्ट्रीज चे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गुरुवारी गूगल  (Google) आणि जिओ (Jio) यांनी एकत्रितपणे विकसित केलेला नवा स्मार्टफोन 'जिओफोन नेक्स्ट' (JioPhone Next) ची आज घोषणा केली. हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. रिलायन्सच्या 44 व्या अॅन्युएल जनरल मिटिंगमध्ये (Annual General Meeting 2021) याची घोषणा करण्यात आली.  10 सप्टेंबर 2021 रोजी हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होईल. सर्वसामान्यांचा विचार करुन हा स्मार्टफोन बनवण्यात आला आहे. याची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असेल, असे मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितले.

या स्मार्टफोनमध्ये व्हॉईस असिस्टंट, लॅग्वेज ट्रान्सलेशन, स्मार्ट कॅमेरा आणि इतर अन्य फिचर्स देण्यात आले आहेत. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहुर्तावर हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये Google Cloud's cutting-edge टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

JioPhone Next (Photo Credits: Reliance)

रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 chipset प्रोसेसर उत्तम रॅम आणि इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे, यात दोन्ही म्हणजेच रियर आणि फ्रंट कॅमेरा असेल. तसंच 2,000mAh ची बॅटरी असून Android Go वर तो कार्यरत असेल.

JioPhone Next (Photo Credits: Reliance)

खास करुन भारतीयांसाठी असलेल्या जिओफोन नेक्स्ट 5 जीी स्मार्टफोन युजर्स गुगल प्ले स्टोअरवरुन देखील डाऊनलोड करु शकतात. अनेक वैशिष्ट्यं आणि फिचर्स असलेल्या या स्मार्टफोन हा केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे.

दरम्यान, 2021 मध्ये जिओ 5G सुविधा लॉन्च करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी मागील वर्षीच केली होती. याद्वारे भारतीयांना वेगवान आणि स्वस्त 5G सेवा देण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले होते.