WhatsApp (PC- Pixabay)

मल्टीप्लेटफॉर्म मेसेजिंग अॅप WhatsApp ने ऑगस्ट 2023 मध्ये 74 लाख खात्यांवर बंदी घातल्याचे पुढे आले आहे. सदर खातेधारकांनी आयटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे पुढे आल्यानंतर व्हॉट्सअॅपने ही कारवाई केल्याचे मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या ताज्या भारतीय मासिक अहवालात ही माहिती पुढे आली आहे. वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी 35 लाख खाती सक्रियपणे प्रतिबंधित करण्यात आली होती, असे त्यात म्हटले आहे.

'User-safety report' मध्ये मध्ये प्राप्त झालेल्या वापरकर्त्याच्या तक्रारींचा तपशील आणि WhatsApp द्वारे केलेल्या संबंधित कारवाई तसेच प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाचा सामना करण्यासाठी WhatsApp ने ही कारवाई केली. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान, एकूण 7,420,748 WhatsApp खाती प्रतिबंधित करण्यात आली होती. वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी यापैकी 3,506,905 खात्यांवर सक्रियपणे बंदी घालण्यात आली होती, असे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, +91 फोन नंबरद्वारे भारतीय खाते ओळखले जाते.

WhatsApp हे एक विनामूल्य, मल्टीप्लेटफॉर्म मेसेजिंग अॅप आहे. जे आपल्याला व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल सेवा देते. शिवाय मजकूर संदेश पाठवायला मदत करते. त्याशिवायही इतर काही सेवा देते. महत्त्वाचे म्हणजे हे अॅप 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्त्यांसह, WhatsApp विशेषतः मित्र आणि कुटुंबांमध्ये लोकप्रिय आहे. जे वेगवेगळ्या देशांमध्ये राहतात आणि संपर्कात राहू इच्छितात.

इंटरनेटवरील माहितीनुसार, WhatsApp हे विनामूल्य, इंटरनेट-आधारित संदेशन ऑफर करणारे पहिले मोबाइल अॅप होते. सेल्युलर-डेटा नेटवर्क वापरून मजकूर पाठवण्याऐवजी, जेथे शुल्क लागू होऊ शकते, WhatsApp प्रामुख्याने संदेश आणि कॉल विनामूल्य पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी Wi-Fi कनेक्शनवर अवलंबून असते