दिवाळी 2019: यूसुफ पठाण याने अशा पद्धतीने केली दिवाळी साजरी; हे पाहून प्रत्येकाला वाटेल अभिमान
Yusuf Pathan (Photo Credit: Twitter)

भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाण (Yusuf Pathan) ज्याप्रमाणे मैदानात असताना चाहत्यांना प्रभावित करत असतो. त्याचप्रमाणे युसूफ पठाणने मैदानाबाहेरही उत्तम कामगिरी करुन सर्वांचे लक्ष स्वत: कडे आकर्षित केले आहे. या दिवाळीत युसूफ पठाणने भारतीय जवानांची भेट घेवून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे. त्यानंतर युसूफ पठानने ही पोस्ट ट्विटरवर शेअर करत भारतीय जवानांविषयी आपले मत मांडले आहे. यानंतर युसूफ पठाणची ही पोस्ट पाहून अनेक लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारताचा आक्रमक फलंदाज युसूफ पठाण याने यावेळी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरा केली आहे. युसूफ पठाणने त्याच्या ट्विटरच्या अकांऊटवरुन फोटो शेअर केला. तसेच एक पोस्टदेखील लिहली आहे. या फोटोमध्ये युसूफ पठाण हा भारतीय जवानांना मिठाई खाऊ घालत असल्याचे दिसत आहे. तसेच भारतीय जवानही त्याला मिठाई भरवत आहेत. पोस्ट करताना युसूफने आपल्या भारतीय जवानांचे कौतूक करत म्हणाला की, जवान आपल्या कुटुंबपासून दूर राहून देशाची रक्षण करत असतात, अशी भावनिक पोस्ट करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे त्याच्या चाहत्यासह अनेकांना युसूफचा अभिमान वाटत आहे. हे देखील वाचा-'मास्टर ब्लास्टर, कॅप्टन कूल, द वॉल, हेरिकेन, कशामुळे भारतीय क्रिकट संघातील 11 खेळाडूंना देण्यात आली अशी नावे, पाहा यामागील रंजक कहाणी

युसूफ पठाणचे ट्विट-

सध्या युसूफ पठाण हा संघाबाहेर असून आयपीएल स्पर्धेत तो हैदराबाद च्या संघाकडून खेळत आहे