वसंत रायजी (Photo Credits: Twitter)

भारताचे सर्वात वयोवृद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटर वसंत रायजी यांचे शनिवारी निधन झाले आहे. वसंत रायजी यांनी वयाची 100 वर्ष जानेवारी महिन्यातच पूर्ण केली होती. रायजी उजव्या हाताचे फलंदाज म्हणून ओळखले जायचे. 1940 मध्ये रायजी यांनी प्रथम श्रेणीतील एकूण 9 सामने खेळले होते. त्यामध्ये एकूण 277 धावा काढल्या होत्या. रायजी यांनी मुंबईच्या रणजी ट्राफीमध्ये बडोदाच्या विरोधात खेळवण्यात आलेल्या सामन्यापासून खेळण्यास सुरुवात केली होती. तसेच 1941 मध्ये बॉम्बे पेंटेंगुलच्या हिंदुज टीमचे ते रिझर्व्ह खेळाडू होते.

क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर रायजी यांनी लेखन करण्यास सुरुवात केली होती. ते पेशान चार्टर्ड अकाउंटेंट होते, 2016 मध्ये बीके गुरुदाचार यांच्या निधनानंतर रायजी देशातील सर्वात वयोवृद्ध प्रथम श्रेणी क्रिकेट ठरले होते.

यंदाच्या वर्षात 26 जानेवारीला रायजी यांनी वयाची 100 वर्ष पूर्ण करत वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर , स्टीव वॉ यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली होती. सात मार्चला जॉन मॅनर्स यांच्या निधनानंतर रायजी जगातील सर्वात वयोवृद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटर ठरले.