पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी पीएम-केअर फंडमध्ये (PM Cares Fund) दिलेल्या योगदानाबद्दल क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पीएम मोदी यांनी 28 मार्च रोजी पंतप्रधान नागरिक मदत आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत (पीएम-केअर) निधी तयार केला होता आणि देशवासीयांना यासाठी पाठिंबा दर्शवावा असे आवाहन केले. शरद कुमार (Sharad Kumar), रोहित शर्मा (Rohit Sharma), नॅशनल चॅम्पियन ईशा सिंह (Esha Singh) आणि भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) यासारख्या क्रीडापटूंनी कोरोना विरोधात लढाईत आपले योगदान दिले. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून खेळाडूंचे आभार मानले. पीएम केअर फंडमध्ये पैसे देणाऱ्या सिने तारकांची यादी वाढत चालली आहे. अक्षय कुमार, सारा अली खान, कार्तिक आर्यन, कपिल शर्मा, अनुष्का शर्मा यांनी पुढाकार घेत आपले योगदान दिले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये पैसे जमा केले जात आहेत. सध्या, याचा उपयोग कोरोनाशी लढा देण्यासाठी केला जाईल. (COVID-19: युवराज सिंह ने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिली शाहिद अफरीदीला साथ, SA Foundation ला मदत केल्याबद्दल नेटिझन्सकडून टीका)
मोदी यांनी ट्विट केले आणि म्हणाले, “मला खूप आनंद होत आहे की कोविड-19 (COVID-19) चा पराभव करण्यासाठी आमचे कष्टकरी क्रीडापटू अग्रस्थानी आहेत. पीएम केअरमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल मी शरद कुमार, रोहित शर्मा, ईशा सिंह, मिताली राज यांचे आभार मानतो. #इंडियाफाईटसकोरोना." दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार केंद्र शासित प्रदेशात एक कोविड-19 पॉझिटिव्हची नोंद झाली आहे, अशा स्थितीत मंगळवारी देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,251 पर्यंत वाढली आहेत.
I am very happy that our hardworking sportspersons are at the forefront of the battle to defeat COVID-19.
I would like to thank @sharad_kumar01, @ImRo45, @singhesha10, @M_Raj03 for their contribution to PM-CARES. #IndiaFightsCorona
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2020
आयसीएमआरने म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत सीओव्हीआयडी-19 म्हणजेच कोरोना व्हायरस नमुन्यांच्या 42,788 चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 4346 नमुन्यांची चाचणी सोमवारी झाली. हा आकडा आयसीएमआरच्या क्षमतेच्या 36 टक्के बरोबरीत आहे. सोबत असेही सांगण्यात आले की, संबध देशात एकूण 123 लॅब कार्यरत आहेत. 49 खासगी लॅबनाही कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सोमवारी देशातील खासगी लॅबमध्ये 399 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.