Photo Credit- X

Paris Olympic Games 2024: शानदार पद्धतीने पॅरिस ऑलिंपिक 2024 ची मोठ्या धुमधडाक्यात सुरूवात झाली. त्यात सर्व प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी नासानेदेखील शनिवारी अंतराळातून पॅरिस (Paris Olympic)कसे दिसते त्याचे मनमोहक दृश्य शेअर केले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) ने त्याच्या X सोशल मीडिया अकाउंटवरून काही प्रतिमा पोस्ट केल्या आहेत. "प्रकाशाचे शहर. पॅरिस, जिथे 2024 ऑलिम्पिक नुकतेच सुरू झाले आहे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून घेतलेल्या या रात्रीच्या फोटोंमध्ये चकाचक होतो,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा:Paris Olympic Games 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात चक्क उलट्या दिशेने फडकवला गेला झेंडा; व्हिडिओ वायरल (Watch Video) )

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना नासाने शेअर केलेले फोटो आवडले असून त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, 'ऑलिंपिक लेझर शो आश्चर्यकारक होता', 'आश्चर्यकारक दृश्य' 'किती आश्चर्यकारक ग्रह,' असे त्यांमी म्हटले आहे ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच, उद्घाटन समारंभ स्टेडियममध्ये नाही तर शहराच्या मध्यभागी नदीच्या पुलावरून परेड काढण्यात आली. (हेही वाचा:Paris Olympics 2024 Opening Ceremony Live Streaming: कधी अन् कुठे? घरबसल्या मोफत पाहा थेट पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा; एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण तपशील)

“पॅरिस झोपण्यास जाते, पण ऑलिम्पिक रिंग अजूनही चमकत आहेत. उद्या खेळ सुरू होतील,” अशी पोस्ट अधिकृत पॅरिस ऑलिम्पिक X खात्यावरून करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ग्रीसच्या प्रतिनिधींनी नदीवरील बोटींच्या परेड ऑफ द नेशन्सने झाली. जवळपास 200 देशांतील खेळाडूंनी त्यांच्या देशाचे नेतृत्व केले.