Photo Credit- X

Paralympic 2024: टोकियोमध्ये भारताने 19 पदकांची कमाई केली होती. 19 मेडलसह भारत मेडल टॅलीमध्ये 26 व्या क्रमांकावर राहिला होता. यंदा पॅरिस पॅरालिम्पिकच्या सुरुवातीच्या दिनापासून भारताने दमदार कामगिरी करत टोकियोमधील मेडल टॅलीचा रेकॉर्ड मोडला (Paralympics 2024 Medal Tally) आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने 10 दिवसात 29 पदकांची कमाई(Paris Paralympics Medal Tally) केली आहे. त्यामुळे भारताच्या मेडल टॅलीमध्ये वाढ झाली असून भारत 16 व्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: Paralympics 2024: मेडल्स मंडे! एका दिवसात 8 पदके जिंकताच Sachin Tendulkar कडून पॅरा-ॲथलीट्सचे अभिनंदन)

28 ऑगस्ट रोजी पॅरालिम्पिक खेळांना सुरूवात झाली होती. आज 8 सप्टेंबर रोजी पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोप होत आहे. यंदाच्या पॅरालिम्पिमध्ये भारताने 29 पदके आपल्या नावे केली. ज्यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कास्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नवदीप सिंग,अवनी लेखरा, नितेश कुमार, हरविंदर सिंग, प्रवीण कुमार यांनी बाजी मारत भारताच्या झोळीत सुवर्ण पदके जमा केली.

भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सर्वात मोठी तुकडी ॲथलेटिक्सची पाठवली होती. यामध्ये भारताच्या ॲथलेटिक्सने दमदार कामगिरी करत भारताचा तिरंगा पॅरिसमध्ये फडकवला आहे. मेन्स क्लब थ्रोमध्ये भारताने दोन मेडल मिळवले आहे. धरमबिर आणि प्रणव सुरमा यांनी दोन पदक नावावर केले आहेत, तर गोळाफेकमध्ये भारताचा सचिन खिलारीने भारताला ऐतिहासिक ४० वर्षानंतर मेडल मिळवून दिले. निषाद कुमार आणि योगेश कुथिनिया यांनी त्यांचे पॅरालिम्पिकमधील दुसरे सिल्वर मेडल जिंकले. त्याचबरोबर भारताची स्टार तिरंदाजांची जोडीनं शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी भारताला पॅरिसमध्ये आर्चरीमधून कांस्यपदक मिळवून दिले, तर भारताचा स्टार तिरंदाज हरविंदरने तर कमालचं केली. त्याने दमदार कामगिरी करून भारताला आर्चरीमधून पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले आणि इतिहास रचला.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताची पदकतालिका

1 अवनी लेखरा - 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 (शूटिंग) सुवर्ण

2 मोना अग्रवाल -10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 (शूटिंग) कांस्य

3 प्रीथी पाल - 100 मीटर T35 (ॲथलेटिक्स) कांस्य

4 मनीष नरवाल - 10 मीटर एअर पिस्तूल SH1 (शूटिंग) रौप्य

5 रुबिना फ्रान्सिस- 10 मीटर एअर पिस्तूल SH1 (शूटिंग) कांस्य

6 प्रीथी पाल- 200 मीटर T35 (ॲथलेटिक्स) कांस्य

7 निषाद कुमार - उंच उडी T47 (ॲथलेटिक्स) रौप्य

8 योगेश कथुनिया - डिस्कस थ्रो F56 (ॲथलेटिक्स) रौप्य

9 नितेश कुमार - एकेरी SL3 (बॅडमिंटन) सुवर्ण

10 तुलसीमाथी मुरुगेसन - महिला एकेरी SU5 (बॅडमिंटन) रौप्य

11 मनीषा रामदास - महिला एकेरी SU5 (बॅडमिंटन) कांस्य

12 सुहास यथीराज - पुरुष एकेरी SL4 (बॅडमिंटन) रौप्य

13 राकेश कुमार / शीतल देवी मिश्र - संघ कंपाऊंड खुला (तिरंदाजी) कांस्य

14 सुमित अँटील - भालाफेक F64 (ॲथलेटिक्स) सुवर्ण

15 नित्या श्री सिवन - एकेरी SH6 (बॅडमिंटन) कांस्य

16 दीप्ती जीवनजी- 400 मीटर T20 (ॲथलेटिक्स) कांस्य

17 सुंदर सिंग गुर्जर - भाला F46 (ॲथलेटिक्स) कांस्य

18 अजित सिंग - भाला F46 (ॲथलेटिक्स) रौप्य

19 मरियप्पन थांगावेलू - उंच उडी T63 (ॲथलेटिक्स) कांस्य

20 शरद कुमार - उंच उडी T63 (ॲथलेटिक्स) रौप्य

21 सचिन खिलारी - शॉट पुट F46 (ॲथलेटिक्स) रौप्य

22 हरविंदर सिंग - वैयक्तिक रिकर्व्ह (तिरंदाजी) सुवर्ण

23 धरमबीर - क्लबने 51 (ॲथलेटिक्स) सुवर्ण फेकले

24 प्रणव सूरमा - क्लबने 51 (ॲथलेटिक्स) रौप्य फेकले

25 कपिल परमार - ज्युडो पुरुष  60 किलो J1 कांस्य

26 प्रवीण कुमार - T64 उंच उडी (ॲथलेटिक्स) सुवर्ण

27 होकाटो सेमा - शॉट पुट F57 (ॲथलेटिक्स) कांस्य

28 सिमरन सिंग - 200 मी - T12 कांस्य

29 नवदीप सिंग - भाला F41 सुवर्ण

भारताच्या पॅरा खेळाडूंनी सुवर्ण पदकापासून ओपनिंग केली होती. पॅरा शूटिंग भारताची पॅरा शुटर अवनी लेखाराने दमदार कामगिरी करत दुसरे सुवर्ण पदक मिळवले. त्याचबरोबर मोना अग्रवालने कांस्यपदकावर नाव कोरल. नितेश कुमारने अंतिम सामन्यामध्ये अविश्वनीय कामगिरी करत ग्रेट ब्रिटनच्या बॅडमिंटनपटूला पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला. सुहास यथिराजने त्याचे पॅरालिम्पिकमधील दुसरे सिल्वर मेडल मिळवले. भारताच्या युवा पॅरा बॅडमिंटनपटू तुलसीमथी मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांनी कमालीची कामगिरी करत, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल नावावर केले.