फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये काल यंदाच्या ऑलिंपिक्स गेम्सची सुरूवात झाली आहे. या ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा Seine River च्या काठी झाला. 200 पेक्षा अधिक देशांचे खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. मात्र या सोहळ्याच्या शेवटाला एक विचित्र प्रकार घडला. यावेळी ऑलिंपिक्सचा झेंडा चक्क उलटा फडकवण्यात आला होता. आयफेल टॉवरच्या खाली हा झेंडा उलटा होता. सध्या त्याचे व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहेत.
चक्क उलट्या दिशेने फडकवला गेला ऑलिंपिक्सचा झेंडा
The Olympic flag was hung upside down near the Eiffel Tower at the opening ceremony of the Games. pic.twitter.com/qscJFV51hQ
— S p r i n t e r (@SprinterFamily) July 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)