WWE | (file photo)

'सिल्वर किंग' (Silver King) नावाने प्रसिद्ध असलेला WWE स्टार सेजार बैरन (Cesar Barron) याचे वयाच्या 51 व्या वर्षी निधन झाले. प्रतिस्पर्धी रेसलर गुरेरा याच्यासोबत सामना खेळताना सिल्वर किंग याला रिंगमध्येच हृदयविकाराचा झटका आला. तो रिंगमध्येच कोसळला. सिल्वर किंग रिंगमध्ये कोसळल्यानंतर रेफरीने त्याला उठण्याचा इशारा केला. तरीही तो उठलाच नाही. प्रेक्षकांनाही हा एक शोचाच भाग असलसल्याचे वाटले. मात्र, अनेकदा इशारा करुनही किंग जागचा न हालल्याने संशय आल्याने रेफरींनी डॉक्टरांना इशारा करुन पाचारण केले.

डॉक्टरांच्या एका पथकाने सिल्वर किंग याची तपासणी केली. तपासणी केल्यावर या पथकाने त्याला मृत घोषीत केले. प्राप्त माहितीनुसार, सामना सुरु झाल्यानंतरच सिल्वर किंग याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर काही सेकंदातच त्याने रिंगमध्येच आपले प्राण सोडले.लंडन येथील मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सिल्वर किंग याचा मृत्यू संशयास्पद झाला नसल्याचे म्हटले आहे. सिल्वर किंग हा मेक्सिको येथील नागरिक होता.

सिल्वर किंग याच्या मृत्यूनंतर WWE सपर्स्टार्सनी तीव्र शब्दात दु:ख व्यक्त केले आहे. माजी डब्ल्यूडब्ल्यूई स्टार क्रिस जॅरिक याने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, 'सिल्वर किंग याच्या निधनाने दु:ख झाले. मी त्याच्यासोबत अनेक जबरदस्त सामने खेळले आहेत. त्याच्यासोबत खेळलेला प्रत्येक सामना मला स्मरणीय असेल.' (हेही वाचा, WWE मधील कमी वयात सूपरस्टार झालेल्या टॉप 3 महिला रेसलर)

माजी रॉ जनरल मॅनेजर एरिक बिशफ यानेही किंग सिल्वर याच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 'सिल्वर किंग याच्या निधनाची दु:खद बातमी ऐकून फार वाईट वाटले. तो अनेक महान WWE स्टर्सपैकी एक होता'. त्याच्या आठवणी सतत कायम राहतील अशी भावना त्याने व्यक्त केली.