WWE मधील कमी वयात सूपरस्टार झालेल्या टॉप 3 महिला रेसलर
Youngest Superstars Women Wrestler in WWE | (Image courtesy: Archived, edited and representative images)

Youngest Superstars Women Wrestler in WWE: प्रोफेशनल रेसलिंगमध्ये WWE चे नाव सर्वात वरचे आहे. इथे कामगिरी दाखवणाऱ्या महिला आणि पुरुषांना पैसा, ग्लॅमर आणि तुफान चाहते असे बरेच काही मिळते. पण, टीव्हीवर पाहायला हा खेळ मनोरंजक वाटत असला तरी, WWE सुपरस्टार बनण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. सुपरस्टार होण्यासाठी अनेक रेसलर अनेक वर्षे मेहनहत करत असतात. यात पुरुष आणि महिला असा दोन्ही रेसलर्सचा समावेश असतो. पण, काही रेसलर्स मात्र WWE अल्पावधीतच सुपरस्टार्स पदाला पोहोचतात. आज आम्ही आपल्याला त्या ३ महिला रेसलर्सबाबत सांगणार आहोत. ज्यांनी कमी वयातच WWE सूपरस्टार ही पदवी मिळवली आहे.

साशा बँक्स (Sasha Banks) (वय 26 वर्षे)

साशा बँक्स ही WWE मधील एक यशस्वी आणि कमी वयात सूपरस्टार पदापर्यंत पोहोचलेली महिला रेसलर. WWE ने साशाला 2012मध्ये साईन केले होते. पुढे तिने NXT मध्येही एन्ट्री घेतली. NXTमध्ये दिने अनेक शानदार सामने दिले. NXTची ती महिला चॅम्पीयन ठरली. पण, सोबतच तिने आपला खास चाहता वर्गही तयार केला. 2016 मध्ये साशा बँक्स आणि शार्लेट फ्लेयर या WWE ची पहिल्या महिला रेसलर होत्या. ज्यांनी हॅल ईन ए सॅल पीव्हीपीमध्ये मेन इव्हेंट आणि हॅल इन ए सॅलमध्ये सामना केला. केवळ 26 वर्षांची असलेली साशा आतापर्यंत 4 वेळा रॉ विमेन्स चॅम्पीयन ठरली आहे. (हेही वाचा, ओ माय गॉड! WWE मध्ये बटिस्टाचे कमबॅक)

पेज (Paige) (वय 26 वर्षे)

WWE सुपरस्टार पेज हिने अत्यंत कमी वयात रेसलिंग सुरु केले. पेज जेव्हा 13 वर्षांची होती तेव्हा तिने वर्ल्ड असोशिएशन ऑफ रेसलिंगमध्ये पहिल्यांदा सामना खेळला. महत्त्वाचे म्हणजे या सामन्यांतून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच तिचे कुटुंब चालत असे. त्या काळात ती बेज ब्रिटानी नावाने रेसलिंगमध्ये ओळखली जात असे. 2011 मध्ये पेजला WWE ने साईन केले. पुढे ती NXT मध्ये सहभागी झाली. NXT मध्ये 3 वर्षे घालवल्यावर पेजने 2014 च्या रेसलमेनीया 30मध्ये डेब्यु केला. सध्या ती केवळ 26 वर्षे वयाची आहे.

पेटन रॉयस (Peyton Royce)(26 वर्षे)

पेटन रॉयस ही सध्या WWE मधील आघाडीची स्मॅकडाऊन लाईव्ह आणि द आयकोनिक्स टॅग टीमची सदस्य आहे. तसेच, WWEची सर्वात प्रतिभाशाली फिमेल सुपरस्टारही आहे. पेटन रॉयसला WWE ने 2015मध्ये साईन केले होते. पुढे ती NXT ची घटक बनली. ऑक्टोबर 2016मध्ये पेटन रॉस आणि बिली यांना द आयकॉनिक डुओ टॅग संघात सहभागी करण्यात आले.