ओ माय गॉड! WWE मध्ये बटिस्टाचे कमबॅक
अॅनिमल बटिस्टा (संग्रहित, संपादित प्रतिमा)

WWEच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. WWEने दिलेल्या संकेतानुसार द एनिमल बटिस्टा हा रेसलर पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे. त्यामुळे अर्थातच WWE आणि बटिस्टाच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, बटिस्टा १७ ऑक्टोबरला (भारतीय प्रमाणवेळेनुसार) होणाऱ्या स्मॅकडाऊनच्या एपिसोडमध्ये दिसू शकतो. बटिस्टाचे पुनरागमनही खास आकर्षणाचा विषय ठरणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा रिक फ्लेयर, रॅंडी ऑर्टन, ट्रिपल एच आणि बटिस्टाची जोडी पहायला मिळेल.

रिंगमध्ये या चारही रेसलर्सची जोडी एकदम हटके असते. रॅंडी ऑर्टन, ट्रीपल एच, बटिस्टा आणि रिक फ्लेअरच्या टीमने एवोल्यूशन २००३ ते २००५पर्यंत WWE रॉवर राज्य केले. ही टीम रुथलेस अग्रेशनइराची सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टीमपैकी एक म्हणून ओळखली जाते. आपल्या कार्यकाळात या चारही रेसलर्सनी टायटलमध्ये नाव कोरले. ट्रिपल एचने वर्ल्ड हेवीवेट चँपीयनशिप जिंकली. ऑर्टनने इंटरकॉन्टिनेंटल टायटल आणि बटिस्टा-रिक फ्लेयरच्या जोडीने वर्ल्ड टॅग टीम चॅम्पीयनशीप जिंकली. विशेष म्हणजे या टीमने इतकी वर्ल्ड टायटल जिंकली आहेत की, इतर कोणत्याच टीमने इतकी टायटल जिंकली नाहीत.

दरम्यान, बटिस्टा जून २०१४मध्ये अखेरचे रिंगमध्ये उतरला होता. त्यानंतर त्याचे दर्शन चाहत्यांना रिंगमध्ये झाले नाही. त्यानंतर बटीस्टा आपल्या अभिनयक्षेत्रात व्यग्र राहिलेला पहायला मिळाला. मात्र आता तो पुन्हा एकदा WWEमध्ये पूर्णवेळ दिसणार आहे. बटिस्टा हॉलिवूडचा सुपरस्टारही बनला. त्याने सुमारे ११ सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.