Pro Kabaddi 2019: 'रेकॉर्ड ब्रेकर' प्रदीप नरवाल यंदाच्या प्रो कबड्डी लीगमध्ये मोठा विक्रम अर्जित करण्याच्या उंबरठ्यावर, वाचा सविस्तर
प्रदीप नरवाल (Photo Credit: Pro Kabaddi/Twitter)

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगच्या सातव्या हंगामाला उद्या म्हणजे 20 जुलै पासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात तेलुगू टायटन्स (Telugu Titans) आणि यू मुंबा (U-Mumba) यांच्यात हैदराबाद येथे लढत होईल. तर सध्याचा विजेता बंगळुरू बुल्स (Bangaluru Bulls) आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स (Patna Pirates) यांच्यात दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. प्रो कबड्डी लीगने आपल्या प्रत्येक हंगामासोबत चाहते आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या पहिलीच प्रो कबड्डी 2019 च्या सामन्यात पायरेट्सचा प्रदीप नरवाल (Pardeep Narwal) याच्या नावावर एक अनोख्या विक्रमाची नोंद केली जाणार आहे. प्रो कबड्डीच्या यंदाच्या सीजनमध्ये नरवाल 900 रेड पॉईंट्स मिळवण्याचा पराक्रम करून शकतो. प्रो कबड्डी लीग ही या खेळाची अत्यंत प्रतिष्ठित लीग मानली जाते. (Pro Kabaddi League 2019: पुणेरी पलटनच्या कर्णधारपदी सुरजीत सिंह विराजमान)

38 सुपर रेड्स, 44 सुपर 10, 858 रेड पॉईंट्स आणि तीन व्हीव्हीओ प्रो कबड्डी खिताब यासह नारवाल यांनी स्वतःला या खेळाचा एक महान खेळाडू म्हणून स्थापित केले आहे. दरम्यान, नरवाल 900 रेड पॉईंट्स पासून खेळावं 42 पॉईंट्स लांब आहे 900 रेड पॉईंट्स मिळवण्यापासून. आणि जर सर्व सुरळीत सुरु राहिले तर पाइरेट्स नरवाल प्रो कबड्डी च्या इतिहासातील 1000 रेड पॉईंट मिळवणारा पहिला खेळाडू बनत आपल्या कारकिर्दीत आणखी एक सन्मान मिळवू शकतो.

नरवाल यांनी सीझन 2 मध्ये बेंगलुरु बुल्स कडून प्रो कबड्डीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी सीजन 3 मध्ये पाटणा पायरेट्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. यासाठी त्यांना इमर्जिंग प्लेअर ऑफ दी सीझनचा अवॉर्डने सन्मानित केले गेले होते. त्यांनी 116 रेड पॉईंट्स सह सीझनमध्ये सर्वोच्च रेड पॉईंट्सच्या यादीत राहुल चौधरी (Rahul Chaudhari) आणि अनुप कुमार (Anup Kumar) यांच्यासारख्या इतर खेळाडूंना मागे टाकत अव्वल स्थान मिळविले होते.