Pro Kabaddi League 2019: पुणेरी पलटनच्या कर्णधारपदी सुरजीत सिंह विराजमान
(Photo Credit: IANS)

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) मधील पुणेरी पलटन (Puneri Paltan) संघाने आगामी सातव्या हंगामासाठी सुरजीत सिंह (Surjeet Singh) याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. सिंघ, डिफेंडर, सीझन 3 मध्ये पल्टनचा एक भाग होते. पीटीआयशी बोलताना मुख्य प्रशिक्षक अनुप कुमार (Anoop Kumar) म्हणाले की, सुरजीतच्या नेतृत्वाखाली संघ कीर्ति प्राप्त करेल. "सुरजीत हा संघासाठी मौल्यवान आहे आणि त्याचा निश्चितपणे संघाला निश्चित फायदा होईल. त्याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि मला विश्वास आहे की या सीझनमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं खेळ करेल.

सिंघ व्यतिरिक्त संघात नितीन तोमर (Nitin Tomar), गिरीश एर्नाक (Girish Ernak), पवन कुमार (Pawan Kumar) आणि दर्शन काडियान (Darshan Kadian) यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. पीकेएल (PKL) चा सातवा हंगाम 20 जुलै रोजी हैदराबादमध्ये सुरू होईल आणि पुणेरी पल्टनचा पहिला सामना 22 जुलै रोजी हरियाणा स्टीलर्स (Haryana Stealers) विरुद्ध खेळाला जाईल. आगामी सीजनसाठी एक नवीन जर्सीही लॉन्च करण्यात आली.

दरम्यान, मागील हंगामात प्रो-कबड्डीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप पडली होती. चढाईपटूंमध्ये सिद्धार्थ देसाई, श्रीकांत जाधव, निलेश साळुंखे, रिशांक देवाडीगा बचावपटूंमध्ये पुणेरी पलटणच्या गिरीश एर्नाकने सर्वोत्तम कामगिरी केली होती.