नॉर्मन हंटर (Photo Credit: Getty)

जगभर पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी आणि या महामारीचा अंत करण्यासाठी प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, जगभरात संक्रमित लोकांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही थांबलेली नाही. दरम्यान, क्रीडा जगातून एक बातमी समोर आले आहे की इंग्लंडचे फुटबॉलर वर्ल्ड कप विजेत्या संघाचे खेळाडूला कोरोना व्हायरसची लागण झाली आणि ते मृत्यूशी संघर्ष करीत आहेत. इंग्लंडच्या 1966 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य नॉर्मन हंटर यांना गेल्या आठवड्यात कोरोना विषाणूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि लीड्स फुटबॉल क्लबने दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक बनली आहे. 76 वर्षीय हंटर वर्ल्ड कप विजेत्या टीमचे सदस्य होते, पण त्यांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यांनी लीड्सला दोन इंग्लिश पदकं जिंकवून दिली होती. इंग्लंडकडून हंटरने 28 सामने खेळले आहेत. (Coronavirus: कतारच्या वर्ल्ड कप स्टेडियममध्ये काम करणारे 5 कर्मचारी कोविड-19 पॉसिटीव्ह, देशात संक्रमित लोकांची संख्या 3 हजार पार)

लीड्स फुटबॉल क्लबच्या निवेदनानुसार, "नॉर्मन अद्याप हंटर हॉस्पिटलमध्ये कोविड-19 शी झुंज देत आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे." विशेष म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव इंग्लंडमध्येही दिसून येत आहे. शाही कुटुंब ते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. तथापि, उपचारानंतर दोघेही आता बरे झाले आहेत. लॉकडाउन इंग्लंडमध्येही सुरू आहे.

जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 21,82,823 इतकी झाली आहे, तर 1,45,551 जणांना या व्हायरसमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रभाव क्रीडा क्षेत्रातही दिसत आहे. दरम्यान, यापूर्वी जुव्हेंटसच्या तीन खेळाडूंची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यापैकी युवेन्ट्सचा फॉरवर्ड पाउलो डेबलला कोरोना विषाणूचा पराभव करण्यात यशस्वी झाला आहे. पाउलो व्यतिरिक्त डेनियल रुगानी (Daniele Rugani) आणि ब्लेस मैत्यूदी (Blaise Matuidi) यांचीही कोरोना टेस्ट सकारात्मक आली. मैत्यूदी फ्रांसच्या 2018 वर्ल्ड चॅम्पियन टीमचे सदस्य होते. रुगानी हे संक्रमित झालेल्या सेरी एचे पहिले फुटबॉलर आहेत.