
2023 Men’s FIH Hockey World Cup: भारताने 13 जानेवारीपासून FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2023 च्या 15 व्या हंगामाचे आयोजन करण्याची तयारी पूर्ण केली आहे. बेल्जियम पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषक 2023 मध्ये त्यांच्या विजेतेपदाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करेल, तर ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. यावेळी दावेदारांच्या यादीत यजमान टीम इंडियाचाही समावेश आहे, टीम इंडियाने अखेरचा हॉकी वर्ल्ड कप 1975 मध्ये जिंकला होता. या विश्वचषकात टीम इंडिया 13 जानेवारीपासून स्पेनविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना हॉकी संघाकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर मनप्रीत सिंह अँड कंपनी ओडिशामध्ये चमक दाखवण्यासाठी सज्ज आहे. या विश्वचषकाचे सर्व सामने टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील, तर ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चाहत्यांना आनंद घेता येईल.
टीम इंडियाचा दुसरा ग्रुप स्टेज मॅच 15 जानेवारीला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. त्यांच्या अंतिम साखळी सामन्यात भारतीय संघ 19 जानेवारीला भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर वेल्सशी भिडणार आहे. 22 जानेवारीपासून बाद फेरीला सुरुवात होणार असून अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी ओडिशातील कलिंगा स्टेडियमवर होणार आहे. (हे देखील वाचा: 2023 Men’s FIH Hockey World Cup: शुक्रवारपासुन सुरु होणार हॉकीचा महाकुंभ, 'या' स्पर्धेचे संपूर्ण स्वरूप पहा इथे)
सामन्याचा आनंद कधी, कुठे आणि कसा घ्याल
भारतातील पुरुष हॉकी विश्वचषक 2023 चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 एचडी टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. वापरकर्त्यांना त्यांच्या संबंधित डीटीएच सेवा प्रदात्यांसोबत चॅनेलचे सदस्यत्व घ्यावे लागेल. त्याच वेळी, या विश्वचषकाचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध असेल.
टीम इंडियाचा पहिला सामना 13 जानेवारीला
यावेळी टीम इंडिया ग्रुप-डीमध्ये इंग्लंड, स्पेन आणि वेल्ससोबत आहे. यापैकी फक्त इंग्लंडचा संघ FIH क्रमवारीत भारतापेक्षा वर आहे. टीम इंडिया सहाव्या तर इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. स्पेन आठव्या आणि वेल्स 15व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना 13 जानेवारीला स्पेनशी, दुसरा सामना 15 जानेवारीला इंग्लंडविरुद्ध आणि तिसरा सामना 19 जानेवारीला वेल्सशी होणार आहे.