कुस्तीपटू बबीता फोगाट हिने वडील महावीर फोगाट यांच्यासोबत केला भारतीय जनता पक्षात प्रवेश
Wrestler Babita Phogat Join BJP | (Photo Credits: ANI)

कुस्तीपटू बबीता फोगाट (Wrestler Babita Phogat) हिने वडील महावीर फोगाट (Mahavir Singh Phogat) यांच्यासह आज (सोमवार, 12 ऑगस्ट 2019) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी भाजप (BJP) नेते अनिल जैन, रामविलास शर्मा आणि अनिल बलूनी हे देखील उपस्थित होते. फोगाट यांच्या भाजप प्रवेशामुळे हिरयाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (JJP) ला मोठा झटका बसला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बबीता किंवा तिचे वडील महावीर यांना भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ शकतो. सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्याबद्दल बबीता फोगाट हिने सरकारचे कौतुकही केले होते. फोगाट हिने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले एक भाषणही फोगाट हिने रिट्विट केले होते. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी मध्ये बबीता फोगाट हिचे वडील महावीर फोगाट हे स्पोर्ट विंगचे प्रमुखपद सांभाळत होते. (हेही वाचा, खल्लास..! ईशा कोप्पीकर देणार कमळाला साथ, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश)

एएनआय ट्विट

दरम्यान, महावीर फोगाट यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले काम करत आहेत. त्यांनी गृहमंत्री अमीत शाह यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचा निर्णय ऐतिसिक आहे. या निर्णयाने हा देश एकजूट होण्यास मदत होणार आहे. मी पहिल्यापासून अशा निर्णयाचे स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदी हे मला प्रेरणा देतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चांगली वाटचाल करतो आहे.