Wrestler Murder Case: ऑलिम्पिक पदक विजेता Sushil Kumar वर एक लाख रुपयांचे बक्षीस, हत्येच्या आरोपाखाली दिल्ली पोलिस शोधात
सुशील कुमार (Photo Credits: Instagram)

Wrestler Murder Case: भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारच्या (Sushil Kumar) अडचणीत वाढ होणे सुरूच आहे. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने छत्रसाल स्टेडियमवरील  (Chhatrasal Stadium) प्राणघातक हल्ला आणि हत्येच्या प्रकरणात पैलवानविरुद्ध यापूर्वीही अन्य अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. विशेष म्हणजे कुमार अद्याप फरार असून दिल्ली पोलिसांनी  (Delhi Police) कुस्तीपटू सुशील कुमारवर 1 लाख रुपये आणि त्याचा दुसरा साथीदार अजयवर 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र सुशीलने हरिद्वार आणि त्यानंतर हृषीकेशकडे पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच सुशील कुमारविरोधात लूकआऊट नोटीस बजावली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यासाठी संघर्ष झाला होता. या प्रकरणात कुमार यांचे नाव असून दिल्ली NCR शिवाय शेजारील राज्यांमध्येही सुशीलचा शोध सुरू आहे. जर सूत्रांच्या माहितीनुसार त्याचा पत्ता सतत बदलत आहे. (Sagar Rana Murder Case: फरार कुस्तीपटू Sushil Kumar च्या अडचणीत वाढ; सागर राणा हत्येप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी)

4 मे रोजी छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटात चकमक झाली आणि ज्यात 23 वर्षीय सागर धनकरचा मृत्यू झाला. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेले सुशील छत्रसाल स्टेडियमवर अधिकारी म्हणून विशेष ड्युटी म्हणून तैनात होते जिथे भांडण झाल्याचा आरोप आहे. “कुमारविरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे,” अतिरिक्त पोलिस उपायुक्त (उत्तर पश्चिम दिल्ली) डॉ. गुरिकबळ सिंह सिद्धू यांनी सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील, अजय, प्रिन्स, सोनू, सागर, अमित आणि इतर यांच्यात पार्किंग क्षेत्रात हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

सिद्धू म्हणाले होते की, “दिल्ली पोलिसांनी स्थानिक रूग्णालयात बळी पडलेल्यांचे निवेदन नोंदविले आहे आणि त्याने कुमारवर आरोप केले आहेत. आम्ही त्यांच्या घरी टीम पाठवली पण तो सापडला नाही.”