ऑलिम्पिक पेहेलवान वीरेंद्र सिंह नागपूर मधील मूकबधिर मुलीसोबत करणार विवाह; नरेंद्र मोदी यांना खास आमंत्रण देत मागितले आशीर्वाद
Virender Singh (Photo Credits: Twitter)

डिफऑलिम्पिक मध्ये भारताचे नेतृत्व करणारा पेहेलवान वीरेंद्र सिंह (Virender Singh) हा येत्या 30 जानेवारी रोजी नागपूर (Nagpur) मध्ये विवाहबंधनात अडकणार आहे, एका अनाथ मूकबधिर मुलीशी त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी 30 जानेवारी रोजी एका मंदिरात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी वीरेंद्रने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आमंत्रण दिले असून, तुमच्या आशीर्वादाने मला माझ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करायची आहे असे म्हणणारे एक खास ट्विट सुद्धा केले आहे. या आमंत्रणाला सध्या तरी मोदींच्या वतीने काहीही उत्तर आलेले नसले तरी एका मूकबधिर मुलीशी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेण्यासाठी वीरेंद्र वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आजवर त्याने भारतासाठी डिफऑलिम्पिक स्पर्धेत 3 सुवर्ण व 4 कांस्य पदके मिळवली आहेत. भारतीय संघाचा ऑलराउंडर स्टार हार्दिक पांड्या मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टेनकोविच हिला अनोख्या पद्धतीने प्रपोज करत केली Engagement (Video)

वीरेंद्र सिंह हा स्वतः मूकबधिर असून तो भारतातील एका छोट्याश्या खेड्यातून आलेला आहे. शारीरिक त्रुटींवर मात करून त्याने अथक प्रयत्नातून आजवर भारतासाठी अनेक गौरव मिळवून आणले आहेत. यातीलच काही म्हणजे, वीरेंद्रने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जागतिक जेतेपद आणि तीन विश्व डेफ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक जिंकली आहेत. थोडक्यात, वीरेंद्रने सहभाग घेतलेल्या 7 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 7 पदके मिळविली आहेत.

पहा वीरेंद्र सिंह याचे ट्विट

जुलै 2015 मध्ये वीरेंद्र याला भारताच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारव त्याआधी राजीव गांधी राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला होता. क्रीडा क्षेत्रासोबतच राजकीय विषयात देखील वीरेंद्र बराच ऍक्टिव्ह आहे.